Sunday, November 09, 2025 10:20:19 AM

डोंबिवली एमआयडीसीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू

डोंबिवली एमआयडीसीच्या फेज - २ मधील सोनारपाडा जवळ रसायन कंपनीत बॉयलरचा स्फोट झाला आणि आग लागली.

डोंबिवली एमआयडीसीत स्फोट ८ जणांचा मृत्यू

डोंबिवली : डोंबिवली एमआयडीसीच्या फेज - २ मधील सोनारपाडा जवळ रसायन कंपनीत बॉयलरचा स्फोट झाला आणि आग लागली. ही आग वेगाने पसरली. एमआयडीसीतील तीन कंपन्यांच्या मालमत्तांचे अंबर कंपनीतील दुर्घटनेत नुकसान झाले. या दुर्घटनेत ८ जणांचा मृत्यू झाला आणि ६४ जण जखमी झाले.

स्फोटाच्या हादऱ्याने कंपनीपासून २०० मीटरच्या परिसरातील अनेक खिडक्यांच्या काचा फुटल्या. घटनास्थळी मदतकार्य सुरू आहे. जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे. राज्य शासनाने दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. या घटनेमुळे २०१६ मध्ये डोंबिवलीत झालेल्या स्फोटाच्या कटू आठवणी ताज्या झाल्या आहेत. त्यावेळीही एकामागून एक स्फोट झाल्याने घटनेची तीव्रता वाढली होती.

डोंबिवली एमआयडीसीत २०१६ मध्ये प्रोबेस कंपनीत झालेल्या स्फोटात बारा जणांचा मृत्यू झाला आणि २१५ जण जखमी झाले. प्रोबेस कंपनीतील स्फोटाला २६ मे २०२४ रोजी आठ वर्षे पूर्ण होतील. 


सम्बन्धित सामग्री