Donald Trump: ‘अमेरिका फर्स्ट’चा प्रभाव; फार्मा कंपन्यांशी ट्रम्प यांचा ऐतिहासिक करार

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांनी ‘America First’ धोरणांतर्गत औषधांच्या किमती कमी करण्यासाठी मोठा करार केला आहे.

Donald Trump: ‘अमेरिका फर्स्ट’चा प्रभाव; फार्मा कंपन्यांशी ट्रम्प यांचा ऐतिहासिक करार

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी ‘अमेरिका फर्स्ट’ (America First) धोरणानुसार औषधांच्या किमती कमी करण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे. ट्रम्प यांनी जागतिक स्तरावरील दिग्गज फार्मा कंपन्यांवर दबाव टाकून एक महत्त्वाचा करार केला असून, या कराराचा थेट फायदा अमेरिकन नागरिकांना होणार आहे. या करारामुळे अमेरिकेत औषधांच्या किमती इतर श्रीमंत देशांइतक्या कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

या करारात एकूण नऊ आघाडीच्या फार्मा कंपन्यांचा (Pharma Companies) समावेश आहे. यामध्ये एमजेन (Amgen), ब्रिस्टल मायर्स स्क्विब (Bristol Myers Squibb), बोहरिंगर इंगेलहेम (Boehringer Ingelheim), जेनेंटेक (Genentech), गिलियड सायन्सेस (Gilead Sciences), जीएसके (GSK), मर्क (Merck), नोवार्टिस (Novartis) आणि सनोफी (Sanofi) या कंपन्या आहेत. याआधी झालेल्या करारांसह आता एकूण 14 कंपन्या या उपक्रमात सहभागी झाल्या आहेत.
या कंपन्यांनी मेडिकेड (Medicaid) अंतर्गत विकल्या जाणाऱ्या औषधांच्या किमती इतर विकसित देशांप्रमाणेच ठेवण्यास सहमती दर्शवली आहे. सध्या अमेरिकेत औषधे इतर देशांच्या तुलनेत तीनपट महाग असल्याचे सांगितले जाते. या निर्णयामुळे लाखो रुग्णांना दिलासा मिळणार असून आरोग्यखर्च मोठ्या प्रमाणात कमी होईल, असा दावा ट्रम्प प्रशासनाने केला आहे.

हेही वाचा: Cyclonic Wind Situation: कडाक्याची थंडी आणि दाट धुके; उत्तर भारतात रेड अलर्ट, महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात गारठा वाढणार

ट्रम्प सरकारने या धोरणाला ‘मोस्ट फेवर्ड नेशन प्राइसिंग’ (Most Favoured Nation Pricing) असे नाव दिले आहे. या अंतर्गत नवीन औषधे विमा (Insurance) असो किंवा थेट रोख पेमेंट (Cash Payment), सर्व बाजारात एकाच कमी दरात उपलब्ध होतील. काही औषधांवर तब्बल 70 टक्क्यांपर्यंत सूट (Discount) मिळण्याची शक्यता आहे. व्हाइट हाऊसमधील भाषणात ट्रम्प यांनी “आतापर्यंत अमेरिका जगाला सबसिडी देत होती, आता ते थांबेल,” असे स्पष्ट केले.

याशिवाय, जानेवारीपासून ‘ट्रम्पआरएक्स’ (TrumpRx) हे नवे प्लॅटफॉर्म सुरू करण्यात येणार आहे. या माध्यमातून रुग्ण थेट औषध कंपन्यांकडून औषधे खरेदी करू शकतील. यामुळे मध्यस्थ खर्च कमी होऊन औषधे अधिक स्वस्त मिळतील. काही कंपन्यांनी निवडक औषधांवर मोठ्या सवलती जाहीर केल्या असून, ब्रिस्टल मायर्स स्क्विब कंपनीची रक्त पातळ करणारी एलिक्विस (Eliquis) ही औषधे मेडिकेडमध्ये मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे.

या कराराअंतर्गत फार्मा कंपन्या संशोधनासाठी 150 अब्ज डॉलरपेक्षा अधिक गुंतवणूक (Investment) करणार आहेत. त्यांना तीन वर्षांसाठी फार्मा टॅरिफमधून (Pharma Tariff) सूट देण्यात येणार आहे. तसेच, आपत्कालीन परिस्थिती, महामारी किंवा नैसर्गिक आपत्तीसाठी औषधांच्या कच्च्या मालाचा साठा (Raw Material Reserve) अमेरिकेतच उपलब्ध करून दिला जाणार आहे. या करारानंतर अनेक फार्मा कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ दिसून आली असून, हा करार अमेरिकन आरोग्य व्यवस्थेतील (Healthcare System) एक मोठा बदल म्हणून पाहिला जात आहे.

हेही वाचा: Rajdhani Express Accident: राजधानी एक्स्प्रेसची हत्तींच्या कळपाला धडक; सात हत्तींचा मृत्यू

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number