ब्राझील लिहायचं सोडून थेट भारताचा उल्लेख; डोनाल्ड ट्रम्प यांची सोशल मीडियावर मोठी चूक

ब्राझीलमध्ये सध्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचा थरार सुरू असून, त्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी 'ट्रुथ सोशल' या आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर केली होती. मात्र, ही पोस्ट लिहीत असताना त्यांच्याकडून एक मोठी गफलत झाली.

ब्राझील लिहायचं सोडून थेट भारताचा उल्लेख; डोनाल्ड ट्रम्प यांची सोशल मीडियावर मोठी चूक
Donald Trump

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा आपल्या सोशल मीडिया पोस्टमुळे वादाच्या आणि चर्चेच्या भोवऱ्यात सापडले आहेत. ब्राझीलमध्ये सध्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचा थरार सुरू असून, त्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’ या आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर केली होती. मात्र, ही पोस्ट लिहीत असताना त्यांच्याकडून एक मोठी गफलत झाली. ब्राझीलच्या निवडणुकीबाबत मत व्यक्त करताना त्यांनी ब्राझीलऐवजी थेट ‘भारत’ असा उल्लेख केला. या चुकीमुळे ट्रम्प यांना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर ट्रोल केले जात असून, त्यांच्या या निष्काळजीपणावर जगभरातून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

अमेरिकेतील संथ मतदान प्रक्रियेवर निशाणा

डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये अमेरिकेतील निवडणूक पद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी लिहिले की, आज भारताच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या पहिल्या फेरीच्या निवडणुकीत तब्बल 125000000 लोकांनी मतदान केले आणि प्रक्रिया पूर्ण होताच निकालही तात्काळ जाहीर केले जातील.

हेही वाचा – कोरोनानंतर जगात पुन्हा नव्या संसर्गाची भीती?; रशियातील लॅबमध्ये ‘त्या’ एका चुकीने महिला कर्मचाऱ्याचा मृत्यू

याउलट, अमेरिकेतील डेट्रॉईट, फिलाडेल्फिया आणि कॅलिफोर्निया यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये आणि राज्यांमध्ये मतदानाची टक्केवारी अत्यंत कमी आहे. अमेरिकेतील संथ आणि जुनाट निवडणूक प्रक्रियेवर टीका करण्याच्या नादात त्यांनी ब्राझील ऐवजी भारताचे नाव जोडल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांची फजिती झाली आहे. ट्रम्प यांच्याकडून अशा प्रकारची भौगोलिक व राजकीय चूक होण्याची ही पहिलीच वेळ नाही.

भारत-अमेरिका व्यापारी संबंधांच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांची मानसिक स्थिती?

ट्रम्प यांच्या या गफलतीनंतर राजकीय विश्लेषकांनी आणि नेटिझन्सनी विविध तर्क-वितर्क लावायला सुरुवात केली आहे. सध्या अमेरिका आणि भारत यांच्यात व्यापारी शुल्कावरून मोठी तणावाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. ट्रम्प यांनी यापूर्वी अनेकदा भारतीय उत्पादनांवर मोठा कर लादण्याची धमकी दिली आहे. सध्या त्यांच्या डोक्यात केवळ भारतावर टॅरिफ लादण्याचा विचार सुरू असल्यानेच, ब्राझीलचा विषय मांडतानाही त्यांच्या तोंडून किंवा लेखणीतून ‘भारत’ हेच नाव आले असावे, असा उपरोधिक टोला विरोधकांनी लगावला आहे.

 

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number