Tuesday, June 09, 2026 02:03:41 PM

Iran US Ceasefire: पाकिस्तानच्या पंतप्रधानांची 'ती' पोस्ट थेट 'व्हाईट हाऊस'मधून एडिट?; सीजफायरच्या पोस्टवरून नवा वाद पेटला

या निर्णयामुळे जागतिक तणावात तात्पुरता दिलासा मिळाला आहे. दरम्यान, इराणचे परराष्ट्रमंत्री सैयद अब्बास अराघची यांनीही पाकिस्तानचे आभार मानले आहेत.

iran us ceasefire पाकिस्तानच्या पंतप्रधानांची ती पोस्ट थेट व्हाईट हाऊसमधून एडिट सीजफायरच्या पोस्टवरून नवा वाद पेटला

वॉशिंग्टन: पश्चिम आशियातील तणावपूर्ण परिस्थितीत अचानक मोठी घडामोड घडली असून, युद्धाच्या छायेत सुरू असलेल्या संघर्षाला तात्पुरता ब्रेक लागला आहे. काही तासांपूर्वी अमेरिकेने आक्रमक भूमिका घेतल्यानंतरच अचानक शांततेची घोषणा झाल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

अमेरिका आणि इराण यांच्यात दोन आठवड्यांच्या युद्धविरामाची घोषणा करण्यात आली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी डेडलाइन संपण्यापूर्वीच ही घोषणा करत सांगितले की, बहुतेक मुद्द्यांवर दोन्ही देशांमध्ये सहमती झाली आहे. पुढील चर्चा इस्लामाबाद येथे होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

या घडामोडीत पाकिस्तानची भूमिका महत्त्वाची ठरल्याचे सांगितले जात असले, तरी त्यावरून वाद निर्माण झाला आहे. पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये बदल (एडिट) केल्याचा आरोप होत असून, हा मजकूर पाकिस्तानऐवजी थेट व्हाइट हाऊसमध्ये तयार करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

<script src="https://truthsocial.com/embed.js" async="async"></script>

हेही वाचा: Vasai Crime News : 'त्या' चार वर्षीय निरागस बालकाच्या उपचारासाठी आर्थिक मदत मंजूर; मुख्यमंत्र्यांनी दिल्या तातडीने सहाय्यतेच्या सूचना

ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये स्पष्ट केले की, “मी इराणवर होणारी बॉम्बहल्ल्यांची कारवाई दोन आठवड्यांसाठी स्थगित करण्यास सहमत आहे. हा द्विपक्षीय युद्धविराम असेल.” काही तासांपूर्वीच त्यांनी इराणला गंभीर इशारा दिला होता, त्यामुळे त्यांच्या भूमिकेतील अचानक बदल चर्चेचा विषय ठरला आहे.

या युद्धविरामात पाकिस्तानच्या मध्यस्थीचा उल्लेखही करण्यात आला आहे. ट्रम्प यांनी सांगितले की, शहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख आसिम मुनीर यांच्या विनंतीनंतर हा निर्णय घेण्यात आला. याचबरोबर इराणने ‘स्ट्रेट ऑफ होर्मुझ’ खुला ठेवण्याची अट मान्य केल्याचेही सांगितले जात आहे.

दरम्यान, इराणचे परराष्ट्रमंत्री सैयद अब्बास अराघची यांनीही पाकिस्तानचे आभार मानले आहेत. मात्र या संपूर्ण घडामोडीमुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात नव्या चर्चांना तोंड फुटले असून, पुढील चर्चेतून या युद्धविरामाचा स्थायी तोडगा निघतो का, याकडे जगाचे लक्ष लागले आहे.  

हेही वाचा: Iran US War Update : अमेरिका आणि इराण युद्धाबाबत मोठी अपडेट, दोन्ही देशांनी घेतला महत्त्वाचा निर्णय


सम्बन्धित सामग्री





ताज्या बातम्या




ताज्या बातम्या