नोकरदार लोकांच्या दर महिन्याच्या पगारातून पीएफचे पैसे कापले जातात. दर महिन्याला कापलेले पैसे भविष्यात अडचणीच्या वेळी उपयोगी पडतात. मात्र बऱ्याचजणांना आपले पैसे जमा होतात की नाही, बॅल्नस किती आहे, हेच माहिती नसतं. यापूर्वी PF तपासायचं म्हणजे मोठी कटकट होती. मात्र, आता EPFO ने ही प्रोसेस अतिशय सोपी केलेली आहे.
PF खात्याचे अपडेट्स आता मोबाईलवर
नोकरदार आता थेट व्हॉट्सॲप चॅनलवरुनच पीएफशी संबंधित असलेल्या सर्व महत्त्वाच्या अपडेट जाणून घेऊ शकतात. EPFO ने स्वत:चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल सुरु केलेलं आहे. याच चॅनववर आता EPF, पेन्शन योजना तसेच विमा योजना याबद्दलची माहिती मिळत आहे.
एवढेच नाही तर, सरकारचे नवे निर्णय, योजनेत झालेले अनेक बदल, अर्ज करण्याची शेवटची तारीख शिवाय EPFO कडून केले जाणारे नवे उपक्रम या सर्वांची माहिती आता थेट तुमच्या WhatsApp वर मिळते. दुसरीकडे तक्रार निवारण शिबिर कुठे आहे, पीएफ अॅडव्हान्स कसा काढायचा, यासंबंधित व्हिडिओ आणि ट्युटोरियल लिंकही या चॅनलवर सहज शेअर केल्या जातात.
जॉईन कसं करायचं?, जाणून घ्या
पहिल्यांदा EPFO च्या असलेल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनल लिंकवर क्लिक करा. व्हॉट्सॲप उघडले, तिथेच फ्लॉलो बटण दाबा. त्यानंतर सर्व असलेल्या अपडेट्स तुम्हाला Updates या सेक्शनमध्ये दिसून येतील. एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की, हे चॅनल फक्त आणि फक्त तुमच्या माहितीसाठी आहे. या ठिकाणावरुन तुन्ही पीएफ बॅलन्स तपासू शकत नाही किंवा पैसे ही काढू शकत नाही. क्लेम क्लेम किंवा बॅलन्स तपासण्यासाठी तुम्हाला एपीएफओ पोर्टल, युएमएएनजी अॅपचाच वापर करावा लागणार आहे.
महाराष्ट्राच्या सर्व बातम्या एका क्लिकवर
महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी | Maharashtra News Live Update