Sunday, December 07, 2025 12:15:32 AM

Facebook: गायब होणार फेसबुकचे ‘लाइक’ बटण! वापरकर्त्यांसाठी मोठा धक्का

फेसबुक आपली ओळख बनलेली ‘लाइक’ आणि ‘कमेंट’ बटण वेबसाइटवरून हटवणार आहे.

facebook गायब होणार फेसबुकचे ‘लाइक’ बटण वापरकर्त्यांसाठी मोठा धक्का

Facebook: सोशल मीडियावर “लाईक” बटण हे केवळ एक फीचर नव्हे तर एक डिजिटल भावना बनले होते. पण आता फेसबुक हे आयकॉनिक बटन काही ठिकाणांहून हटवण्याच्या तयारीत आहे. कंपनीने जाहीर केले आहे की 10 फेब्रुवारी 2026 पासून बाह्य (External) वेबसाइट्सवर फेसबुकची Like आणि Comment बटणे दिसणार नाहीत.

बाह्य वेबसाइट्सवरून हटणार ‘Like’ आणि ‘Comment’

फेसबुकने सांगितले की ब्लॉग्स, न्यूज साइट्स किंवा इतर वेबपेजेसवर जिथे फेसबुक पोस्ट एम्बेड केल्या जातात, तिथून लाईक आणि कमेंट बटणे पूर्णपणे हटवली जातील. मात्र, याचा अर्थ असा नाही की फेसबुकच्या स्वतःच्या अॅप किंवा वेबसाइटवर ही बटणे नाहीशी होतील. वापरकर्ते पुढेही पोस्ट, फोटो आणि व्हिडिओ लाईक आणि शेअर करू शकतील.

का केला हा निर्णय?

कंपनीच्या मते, हा निर्णय डेव्हलपर टूल्स अधिक आधुनिक आणि सुलभ बनवण्यासाठी घेण्यात आला आहे. जवळपास एक दशकापूर्वी फेसबुकने ही प्लगइन्स सादर केली होती, ज्यामुळे विविध वेबसाइट्सना फेसबुकवरील पोस्ट्स एम्बेड करता येत आणि थेट त्या साइटवरून लाईक किंवा कमेंट करता येत असे. आता वापरकर्त्यांचा कल आणि तंत्रज्ञानातील बदल पाहता या प्लगइन्सचा वापर खूप कमी झाला आहे.

वेबसाइट्सवर होणार नाही तांत्रिक परिणाम

फेसबुकच्या पॅरेंट कंपनी Meta ने स्पष्ट केलं आहे की या बदलानंतर वेबसाइट्सच्या कोडवर कोणताही तांत्रिक बिघाड किंवा एरर येणार नाही. वेबसाइट्स सुरळीत चालू राहतील. तरीही डेव्हलपर्सना हवे असल्यास ते जुना कोड काढून अधिक अपडेटेड फीचर्स वापरू शकतात, ज्यामुळे यूजर एक्सपीरियन्स सुधारेल.

2009 पासूनचा फेसबुकचा ‘Like’ प्रवास

फेसबुकने 2009 साली ‘Like’ बटन सादर केलं होतं आणि काही वर्षांतच हे फीचर जगभरात लोकप्रिय झालं. न्यूज साइट्सपासून ते ई-कॉमर्स ब्रँडपर्यंत सर्वांनी आपल्या पोस्ट्सवरील लाईक्सच्या आकड्यांवरून लोकप्रियतेचा अंदाज बांधायला सुरुवात केली. “लाईक” बटण हे फेसबुकचं सर्वात मोठं डिजिटल प्रतीक बनलं.

आज तंत्रज्ञानाच्या नव्या युगात, जिथे इन्स्टाग्राम रील्स, थ्रेड्स आणि शॉर्टफॉर्म कंटेंटने सोशल मीडिया बदलला आहे, तिथे हे बटण आता जुनं ठरत आहे. म्हणूनच फेसबुकने आपल्या बाह्य प्लगइन्समधून या बटणाला “रिटायर” करण्याचा निर्णय घेतला आहे.


सम्बन्धित सामग्री