निवडणूक आयोगावर काँग्रेस तसेच राहुल गांधींकडून करण्यात येत असलेल्या आरोपांवर मु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. निवडणूक आयुक्तांच्या पत्रकार परिषदेनंतर विरोधकांकडून करण्यात येत असलेल्या व्होट चोरीच्या आरोपांवर फडणवीसांनी प्रश्न उपस्थित केलेले आहे. विरोधकांचं कथिक फेक नरेटिव्ह हे आता उघड झाल्याचा दावा ही त्यांनी केला आहे.
फडणवीसांचा राहुल गांधींवर घणाघात
फडणवीस म्हणाले की, राहुल गांधी आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांकडून वारंवार मतचोरीचा आरोप केला जात आहे. मात्र, खंर पाहिलं तर त्यांच्या आरोपांमध्ये जराही तथ्य नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या वेळी फडणवीसांनी विरोधकांवर खोचक शब्दांत टीका ही केली. ”हे सतत मतचोरीचा जप करत आहेत, पण प्रत्यक्षात तर यांचा मेंदूच चोरीला गेलेला आहे”, असा टोला त्यांनी लगावला आहे.
मेंदू शोध मोहीम काढा
विरोधकांचा गहाण ठेवलेला आणि चोरीला गेलाला मेंदू परत आणण्यासाठी आता चौकशी समितीच नेमावी का, अशी उपरोधिक टिप्पणी फडणवीसांनी केलीय. पश्चिम बंगालमधील निवडणुकीचं उदाहरण देत त्यांनी विरोधकांच्या सर्व आरोपांवर सवालही उपस्थिक केलाय. एसआयआरअंतर्गत काही मतदारसंघांमध्ये मतदारांची नावे कमी झाली आणि त्यानंतर तिथं भाजपपेक्षा तृणमूल काँग्रेसचे उमेदवारच वियजी झाल्याचं सांगितलं जात आहे.
दुसरीकडे, राहुल गांधीवर टीका करत असताना फडणवीसांनी त्यांच्या भूमिकेवरीही प्रश्न उपस्थित केलेले आहे. संविधान हातात घेऊन ते संवैधानिक संस्थांवर आरोप करणं योग्य नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. संस्थांवरील आरोपांमुळे असंख्य जनतेचा त्यांच्यावरील विश्वास हा कमी करण्याचा प्रयत्न केला जातोय, असा दावा त्यांनी केला.
याच दरम्यान, राहुल गांधींची मानसिकता ही अति डावी झाल्याचाही आरोप फडणवीसांनी केलाय. तसेच संविधान आणि घटनात्मक संस्थांबाबत संभ्रम निर्माण केला जात असल्यांच म्हटलं आहे.
कॅबिनेट मंत्र्यांकडे गेलेल्या पत्राबाबतही फडणवीसांनी स्पष्टीकरण दिलं आहे. वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेली जी बातमी कपोलकल्पित असल्याचा दावा केला आहे. हे पत्र दोन लाख मतपत्रिकांबाबत नसून प्रतिनियुक्तीवरील नियुक्तीशी जोडलेले असल्याचं त्यांनी सांगितलं. महत्त्वाचे म्हणजे, फॉर्म नंबर 6 हा न्यायालयाने ठरवलेल्या नियमांनुसारच असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
आधी EVM वर आरोप, आता थेट आयोगालाच लक्ष्य
कर्नाटकसह तेलंगणामध्ये काँग्रेस विजयी झाली होती तेव्हा निवडणूक आयोगावर काही प्रश्न उपस्थित केले नाही. मात्र, भाजय विजयी होताच आयोगावर केले जात असल्याचा दावा फडणवीसांनी केलेला आहे. यापूर्वी ईव्हीएमवरही आरोप करण्यात आले होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आता थेट निवडणूक आयोगालाच लक्ष्य केलं जात आहे, असे ते म्हणाले.