शेतकऱ्यांसाठी दसऱ्यापूर्वी सरकारची मोठी घोषणा! थेट 30 लाखांपर्यंत सबसिडी, अर्ज करण्याची प्रक्रिया जाणून घ्या

Farmer Scheme : शेतकऱ्यांसाठी सरकारकडून मोठी योजना जाहीर करण्यात आली आहे. दसऱ्यापूर्वी या योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता असून, पात्र शेतकऱ्यांना तब्बल 30 लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळू शकते. मात्र, यासाठी काही महत्त्वाच्या अटी आणि अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.

शेतकऱ्यांसाठी दसऱ्यापूर्वी सरकारची मोठी घोषणा! थेट 30 लाखांपर्यंत सबसिडी, अर्ज करण्याची प्रक्रिया जाणून घ्या
Farmer Scheme 2026

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. आता शेतीची कामे ही अधिक जलद आणि कमी खर्चात होणार आहेत, कारण शेतीसाठी लागत असलेल्या आधुनिक यंत्रांवर सरकारकडून मोठे अनुदान मिळणार आहे. हा निर्णय विशेषतहा उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांसाठी घेण्यात आलेला आहे, अशी माहिती समोर आलेली असून यंदाचा दसरा हा शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने लाभदायर ठरणार आहे. योगी सरकारने बळीराजाला आधुनिक बनवण्यासाठीच ही योजना आणली आहे.

जाणून घ्या महत्त्वाची माहिती
कृषी विभागाच्या माहितीनुसार, सब मिशन ऑन अॅग्रीकल्चरल मेकॅनायझेशन या योजनेअंतर्गत एक दोन नाही तर तब्बल 2 हजार 166 शेती यंत्रांवर सबसिडी मिळणार आहे. तर दुसऱ्या योजनेत आणखी 1,755 या यंत्रांवर आर्थिक मदत दिली जाणार आहे. ज्यामध्ये ट्रॅक्टर, थ्रेशर, रोटाव्हेटरसारखी बरीच उपकरणे समाविष्ट आहेत.

हेही वाचा-मोठी बातमी! हेल्थ इन्शुरन्स असूनही उपचारांसाठी खिशातून पैसे भरावे लागणार?; काय आहे नवा नियम

विशेष म्हणजे फक्त वैयक्तिक शेतकऱ्यांनाच नाही, तर फक्त कस्टम हायरिंग सेंटर तसेच फार्म मशीरी बँक उभारणाऱ्यांनाही 10 लाख रुपयांपर्यत थेट मदत मिळणार आहे.

कधी पर्यंत करता येणार अर्ज?
कृषी ड्रोनसाठीही आता अर्ज करता येणार आहे. तर फसल अवशेष व्यवस्थापनासाठी तब्बल 30 लाखांपर्यंतची अनुदानाची तरतूद आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांना 7 ते 20 ऑक्टोबर या तारखेच्या दरम्यान ऑनलाइन अर्ज करावा लागेल. अर्ज करण्यासाठी ”www.agriculture.up.gov.in” या अधिकृत पोर्टलवर जाऊ Kisan Corner मधील ‘Yantra Booking’ या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number