भारतातील सोन्याचे हे दर सध्याचे असून ते दररोज अपडेट केले जातात. भारतातील सोन्याचे दर जागतिक आणि स्थानिक अशा दोन्ही घटकांद्वारे निश्चित केले जातात. सोन्याची आंतरराष्ट्रीय किंमत, अमेरिकन डॉलरमध्ये होणारी वाढ आणि दागिन्यांसाठी स्थानिक स्तरावर होणारा वापर, विशेषतः सुट्ट्यांच्या किंवा सणासुदीच्या काळात, हे सर्व सोन्याचे मूल्य ठरवतात. राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात. यादरम्यान आज सोने-चांदीच्या दरात मोठे बदल पाहायला मिळत आहेत.
हेही वाचा- Toll Tax Rules 2026 : टोलच्या नियमात मोठा बदल, 'या' महामार्गावर प्रवास करणाऱ्यांना आता मिळणार 70 टक्क्यांपर्यंत मिळणार सूट
25 जानेवारी 2026 रोजी, भारतात 24 कॅरेट सोन्याचा भाव सुमारे ₹16,026 प्रति ग्रॅम आणि 22 कॅरेट सोन्याचा दर ₹14,690 प्रति ग्रॅम जीएसटीसह इतका आहे. यावेळी प्रति 10 ग्रॅमनुसार 24 कॅरेट सोन्याचे दर 1,60,260 इतके आहे, तर 22 कॅरेट सोने 1,46,900 इतके आणि 18 कॅरेट सोन्याचे दर 1,20,190 इतके आहे. तर राज्यातील काही महत्त्वाच्या शहरांतील सोन्याचे दर पाहायचे झाले तर 10 ग्रॅमनुसार मुंबईत 24 कॅरेट सोन्याचा दर 1,60,260 इतका आणि 22 कॅरेट सोन्याचा दर 1,46,900 इतका आहे. तसेच पुण्यात 24 कॅरेट दर 1,60,260 आणि 22 कॅरेट सोने, 1,46,900 इतके आहे. नाशिकमध्ये 24 कॅरेट 1,60,290 इतके असून 22 कॅरेट सोने 1,46,930 इतके आहे.
हेही वाचा- या देशाला सापडलं घबाड! तीन खाणींमध्ये मिळून RBI कडे असलेल्या सोन्याच्या साठ्यापेक्षा 3 पट जास्त सोनं
2026 च्या अखेरीस सोन्याची किंमत काय बदल होणार?
आंतरराष्ट्रीय राजकीय घडामोडींमध्ये मोठे बदल झाल्यामुळे गुंतवणूकदारांना धक्का बसण्याची शक्यता आहे. यामुळे सोने आणि चांदीच्या ईटीएफ फंडांच्या किमती 21 टक्क्यांपर्यंत घसरल्या. तर 2026 च्या अखेरीस सोन्याची किंमत काय बदल होणार याचा अंदाज तज्ज्ञांनी दशर्वला आहे. ताज्या अंदाजानुसार, सोन्याची किंमत सध्याच्या पातळीपेक्षा आणखी 46 टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा आहे. नुकताच सीएनबीसीच्या समोर आलेल्या रिपोर्टनुसार, अमेरिकेत व्याजदरात झालेल्या कपातीमुळे 2026 पर्यंत सोन्याची किंमत प्रति औंस 5,000 डॉलर्सच्या पुढे जाण्याचा अंदाज आहे. त्याचसोबत फेडरल रिझर्व्हने चलनविषयक धोरणात केलेली शिथिलता याकडे तज्ज्ञांचे लक्ष वेधले आहे. व्याजदर कमी झाल्यास गुंतवणुकीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे 2026 च्या अखेरीस सोन्याची किंमत 1.40 लाख ते 1.60 लाख रुपये इतकी होऊ शकते. मात्र जर ही सध्याची जागतिक परिस्थिती अशीच राहिली तर सोन्याची किंमत 2 लाख रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे