Gold Silver Today Rate : सोनं-चांदी स्वस्त की महाग? आजचे नवीन दर जारी; पाहा शहरातील भाव

Gold Silver Rate Today: सणासुदीपूर्वी सोने-चांदी खरेदी करणार असाल तर थांबा! आज 26 सप्टेंबरला सराफा बाजार उघडताच मोठी उलथापालथ झाली.
Today’s Latest Gold and Silver Rates
सोन्याच्या दराने पुन्हा गाठली नवी पातळी

मुंबई : सणासुदीचे दिवस तोंडावर आलेले असून सोने-चांदी खरेदीची विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून सराफा बाजारात वारंवार चढ-उतार पाहायला मिळत आहे.तर आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी आणि देशांतर्गत मागणीमुळे सोने-चांदीच्या दरातही मोठी अस्थिरता दिसून येत आहे.

आजचे दर बदलले?
मागील आठवड्यात सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झालेली पाहायला मिळाली होती.त्यानंतर आता पुन्हा तेजी आली आणि 26 सप्टेंबर 2026 म्हणजे आज सराफा बाजारात सोन्याच्या दरात पुन्हा एकदा मोठा बदल झाला आहे.आजचे ताजे दर पाहिले तर सोने तर सोने पुन्हा एकदा महागले आहे. गेल्या एका वर्षापासून सोने तसेच चांदीच्या किमतीती विक्रमी वाढ होत असताना पाहायला मिळत आहे, त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी कात्री लागत आहे.

 हेही वाचा -लंच ब्रेकमध्ये महिलेचं नशीब चमकलं! 19 कोटी जिंकली तरी 8 तास काम केलं; कारण ऐकून…

जाणून घ्या आजचे लेटेस्ट दर
मिळालेल्या माहितीनुसार,26 सप्टेंबर 2026 रोजी 24 कॅरेट सोने (10 ग्रॅम) हे 1 लाख 51 हजार 179 रुपये आहे, 22 कॅरेट सोने (10 ग्रॅम) 1 लाख 38 हजार 573 रुपये, तर चांगी (1किलो) 2 लाख 34 हजार 610 रुपये आहे. महत्त्वाचे म्हणजे सोने-चांदी दागिन्यांच्या किमती या शहरानुसार बदलत असतात. कारण प्रत्येक राज्यात कर आणि मजुरी ही वेगळी असते.

टीप: हे दर मूळ किंमतीच्या जवळपास आहेत. यामध्ये जीएसटी, टीसीएस, उत्पादन शुल्क आणि मेकिंग चार्जेसचा समावेश नाही. त्यामुळे प्रत्यक्ष दर थोडे जास्त असू शकतात. अचूक दरांसाठी आपल्या स्थानिक सराफाशी संपर्क साधावा.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version