Iran-US Conflict: इराण झुकलं? ट्रम्प यांचा खळबळजनक दावा; युद्ध थांबवण्यासाठी घातली ‘ही’ मोठी अट

इराणच्या नव्या राष्ट्राध्यक्षांनी स्वतः संपर्क साधून युद्धविराम जाहीर करण्याची विनंती केली असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

Iran-US Conflict: इराण झुकलं? ट्रम्प यांचा खळबळजनक दावा; युद्ध थांबवण्यासाठी घातली ‘ही’ मोठी अट

Iran-US Conflict: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पश्चिम आशियातील सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर एक मोठा दावा करून खळबळ उडवून दिली आहे. इराणच्या नव्या राष्ट्राध्यक्षांनी स्वतः संपर्क साधून युद्धविराम जाहीर करण्याची विनंती केली असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. मात्र, हा युद्धविराम स्वीकारण्यासाठी ट्रम्प यांनी इराणसमोर एक अत्यंत कठीण अट ठेवली असून, ती मान्य न झाल्यास इराणला ‘पाषाण युगात’ ढकलून देण्याचा इशाराही दिला आहे.

‘हॉर्मुझची सामुद्रधुनी’ खुली करा; ट्रम्प यांची मुख्य अट
आपल्या ‘ट्रुथ सोशल’ प्लॅटफॉर्मवर माहिती देताना ट्रम्प यांनी म्हटले की, इराणची नवी राजवट पूर्वीपेक्षा कमी कट्टरपंथी आणि अधिक बुद्धिमान आहे. मात्र, युद्धविरामाचा विचार केवळ तेव्हाच केला जाईल, जेव्हा ‘हॉर्मुझची सामुद्रधुनी’ (Strait of Hormuz) पूर्णपणे मुक्त आणि सुरक्षित केली जाईल. जोपर्यंत इराण हे पाऊल उचलत नाही, तोपर्यंत त्यांचा विनाश सुरूच राहील, अशा शब्दांत ट्रम्प यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

इराणने फेटाळला दावा  
ट्रम्प यांचा हा दावा इराणने तातडीने फेटाळून लावला आहे. ‘इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स’ने (IRGC) स्पष्ट केले की, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची ही विधाने हास्यास्पद आहेत. हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणचे नियंत्रण अबाधित असून, केवळ अमेरिकेच्या दबावामुळे किंवा अशा ‘नाटकी’ दाव्यांमुळे ती शत्रूंसाठी खुली केली जाणार नाही, असे इराणने ठामपणे सांगितले आहे. ट्रम्प नक्की कोणत्या नव्या राष्ट्राध्यक्षांबद्दल बोलत आहेत, यावरही इराणने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

हेही वाचा – India Vessels Stuck in Hormuz : इराणची होर्मुझवर ‘टोल’ वसुली; 18 भारतीय जहाजांची कोंडी, ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही तणाव कायम

इराणमध्ये सत्तापरिवर्तन आणि नाटोमधून बाहेर पडण्याचे संकेत
‘रॉयटर्स’ला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प यांनी दावा केला की, त्यांनी इराणमध्ये आधीच ‘सत्तापरिवर्तन’ (Regime Change) घडवून आणले आहे. इराणच्या युरेनियम संवर्धन कार्यक्रमाची अमेरिकेला फारशी चिंता नाही, कारण उपग्रहांच्या माध्यमातून त्यावर लक्ष ठेवणे शक्य आहे, असेही ते म्हणाले. याच मुलाखतीत त्यांनी युरोपबाबतही मोठे विधान केले असून, अमेरिका ‘नाटो’ (NATO) संघटनेतून बाहेर पडण्याच्या पर्यायाचा गांभीर्याने विचार करत असल्याचे संकेत दिले आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number