मालेगाव प्रकरणाची उद्या सुनावणी; त्याआधीच धक्कादायक प्रकार, आरोपीच्या घराची तोडफोड

नाशिकमधील मालेगाव प्रकरणाला आता एक वेगळं वळण आलं आहे.

मालेगाव प्रकरणाची उद्या सुनावणी; त्याआधीच धक्कादायक प्रकार, आरोपीच्या घराची तोडफोड
Accused House Vandalism

नाशिकमधील मालेगाव प्रकरणाला आता एक वेगळं वळण आलं आहे. नोव्हेंबर 2025 मधील डोंगराळे भागातील अल्पवयीन मुलीवर विजय खैरनारने अत्याचार करत तिची निर्घृणपणे हत्या केली. उद्या, 30 सप्टेंबरला या प्रकरणाचा निकाल लागणार होता, मात्र त्याविषयी एक मोठी अपडेट समोर आली आहे.

काल मध्यरात्रीच्या सुमारास या आरोपीचे घर पाडल्याची माहिती समोर आली आहे. अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व हत्या प्रकरणातील आरोपीचे घर अज्ञातांनी पाडले. आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, अशी नागरिकांची मागणी करत नोव्हेंबर महिन्यात आंदोलन देखील केले होते, याविषयी उद्या सुनावणी होणार होती; परंतु निकालाच्या पार्श्वभूमीवर आरोपीच्या आरोपीच्या घराची तोडफोड करण्यात आली आहे.

घर पाडल्याची माहिती मिळताच मालेगाव तालुका पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांचा तपास सुरू असून उद्याच्या निकालाकडे डोंगराळेसह संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा – पुण्यात पुन्हा संतापजनक घटना! महानगरपालिका कर्मचाऱ्याकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; ‘वडिलांना मारून…

 

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number