IIT Student High Salary : गुगल-मायक्रोसॉफ्ट नाही, ‘या’ कंपनीने दिले अडीच कोटींचे पॅकेज; वाचा कोण आहे हा लकी विद्यार्थी?

Indian Institute of Technology Hyderabad मध्ये इतिहास घडवत कॉम्प्युटर सायन्सच्या विद्यार्थ्याला तब्बल अडीच कोटी रुपयांचे विक्रमी पॅकेज मिळाले आहे.

IIT Student High Salary : गुगल-मायक्रोसॉफ्ट नाही, ‘या’ कंपनीने दिले अडीच कोटींचे पॅकेज; वाचा कोण आहे हा लकी विद्यार्थी?

हैद्राबाद: देशभरात कॅम्पस प्लेसमेंटचा वेग मंदावलेला असताना आणि टॉप अभियांत्रिकी महाविद्यालयांतील पॅकेजेसकडे सर्वांचे लक्ष असताना, IIT हैद्राबादने (Indian Institute of Technology Hyderabad) मात्र इतिहास रचला आहे. संस्थेच्या स्थापनेपासून (2008) आजपर्यंतचा सर्वात मोठा पॅकेज एका विद्यार्थ्याने मिळवला असून, हा वार्षिक पगार तब्बल अडीच कोटी रुपये आहे.

हे विक्रमी पॅकेज कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग शाखेतील अंतिम वर्षाचा विद्यार्थी एडवर्ड नाथन वर्गीज (Edward Nathan Varghese) याला मिळाले आहे. तो जागतिक ट्रेडिंग कंपनी Optiver मध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करणार असून, जुलैपासून नेदरलँड्समध्ये पूर्णवेळ नोकरी सुरू करणार आहे. विशेष म्हणजे, ही ऑफर दीर्घ मुलाखतींच्या प्रक्रियेतून नव्हे, तर उन्हाळी इंटर्नशिपनंतर मिळालेल्या प्री-प्लेसमेंट ऑफर मधून मिळाली आहे.

IIT हैद्राबादने दिलेल्या माहितीनुसार, याआधी 2017 मध्ये सुमारे एक कोटी रुपयांचे पॅकेज हे संस्थेतील सर्वोच्च ऑफर मानले जात होते. तो विक्रम आता मोडीत निघाला आहे. आतापर्यंत 60 ते 90 लाख रुपयांचे पॅकेजही या तुलनेने नव्या IIT साठी अत्यंत उल्लेखनीय मानले जात होते.

हेही वाचा: ICC Player Ranking : टीम इंडियाचा तिन्ही फॉरमॅटमध्ये दरारा; जसप्रीत बुमराह आणि जडेजाने गाजवलं मैदान

वरघीसने ऑप्टिव्हरमध्ये दोन महिन्यांची इंटर्नशिप पूर्ण केली होती. त्यानंतर प्रशिक्षण आणि प्रोजेक्टच्या आधारे त्याची निवड झाली. या इंटर्नशिपसाठी दोन विद्यार्थी निवडले गेले होते, मात्र पूर्णवेळ नोकरीची ऑफर फक्त त्यालाच मिळाली. त्यामुळे IIT हैद्राबादच्या आंतरराष्ट्रीय प्लेसमेंटमध्येही हा एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.

“ही माझी पहिली आणि शेवटचीच मुलाखत होती. माझ्या मेंटॉरने ऑफर मिळणार असल्याचे संकेत दिले तेव्हा मी आणि माझे आई-वडील खूप आनंदी झालो,” असे वरघीसने सांगितले. हैदराबादमध्ये जन्मलेला वरघीस पुढील शिक्षणासाठी बेंगळुरूला गेला होता. स्पर्धात्मक प्रोग्रामिंगमध्ये त्याची विशेष आवड असून, तो देशातील टॉप 100 प्रोग्रामर्समध्ये गणला जातो. याच तयारीचा फायदा मुलाखतीत झाला, असे त्याचे म्हणणे आहे.

या यशामुळे केवळ एका विद्यार्थ्याचेच नव्हे, तर संपूर्ण IIT हैद्राबादच्या प्लेसमेंट सेललाच चालना मिळाली आहे. याच वर्षी कॉम्प्युटर सायन्सच्या आणखी एका विद्यार्थ्याला 1.1 कोटी रुपयांचे पॅकेज मिळाले आहे. एकूणच 2025 च्या प्लेसमेंट सिझनमध्ये संस्थेचा सरासरी पॅकेज सुमारे 75 टक्क्यांनी वाढून 36.2 लाखांवर पोहोचल्याचे सांगितले जाते. पहिल्या टप्प्यातच 24 आंतरराष्ट्रीय ऑफर्स मिळाल्या आहेत.

IIT हैद्राबादच्या ऑफिस ऑफ करिअर सर्व्हिसेसचे प्रभारी प्राध्यापक मयूर वैद्य यांनी सांगितले की, “फक्त मोठ्या पॅकेजेसवर लक्ष केंद्रित न करता, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना चांगल्या संधी मिळाव्यात हा आमचा उद्देश आहे.” पुढील टप्प्यात विशेषतः पदव्युत्तर (Post Graduation) विद्यार्थ्यांसाठी प्लेसमेंट प्रक्रिया सुरू राहणार असून, आतापर्यंत 650 पैकी 196 पदव्युत्तर विद्यार्थ्यांना ऑफर्स मिळाल्या आहेत.

हेही वाचा: New Rules for Gig Workers: सरकारचा मोठा निर्णय, फक्त ​90 दिवस काम आणि…; गिग कामगारांना मिळणार 'या' सर्व सुविधा

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number