Heatwave Impact: भारतातील शेती धोक्यात! उष्णतेच्या लाटांमुळे ‘या’ पिकाच्या उत्पादनाला सर्वाधिक फटका; WMO च्या अहवालात धक्कादायक खुलासा

WMO यांनी प्रसिद्ध केलेल्या ताज्या अहवालानुसार, येत्या काळात उष्णतेच्या लाटांचा (Heatwaves) भारतीय पिकांवर विनाशकारी परिणाम होऊ शकतो.

Heatwave Impact: भारतातील शेती धोक्यात! उष्णतेच्या लाटांमुळे ‘या’ पिकाच्या उत्पादनाला सर्वाधिक फटका; WMO च्या अहवालात धक्कादायक खुलासा

Heatwave Impact: भारताच्या कृषी क्षेत्रावर प्रतिकूल हवामानाचे गंभीर संकट ओढावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. संयुक्त राष्ट्रांची 'अन्न आणि कृषी संस्था' (FAO) आणि 'जागतिक हवामान संस्था' (WMO) यांनी प्रसिद्ध केलेल्या ताज्या अहवालानुसार, येत्या काळात उष्णतेच्या लाटांचा (Heatwaves) भारतीय पिकांवर विनाशकारी परिणाम होऊ शकतो. विशेषतः तांदूळ उत्पादनासमोर यामुळे मोठे आव्हान उभे ठाकणार असून, याचा थेट परिणाम देशाच्या अन्नसुरक्षेवर होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

नदी खोऱ्यांमधील शेती आणि मजुरांना सर्वाधिक धोका
अहवालात नमूद केल्याप्रमाणे, तीव्र उष्णतेचा सर्वाधिक फटका गंगा आणि सिंधू नद्यांच्या खोऱ्यांमधील दाट लोकसंख्या असलेल्या कृषी क्षेत्रांना बसणार आहे. या भागांत केवळ पिकांचेच नुकसान होणार नाही, तर शेतात काम करणाऱ्या लाखो कृषी मजुरांच्या आरोग्यावर आणि कार्यक्षमतेवरही विपरित परिणाम होईल. भविष्यातील उष्णतेच्या घटना या क्षेत्रातील संपूर्ण कृषी अन्नप्रणाली विस्कळीत करू शकतात, असा धोक्याचा इशारा या अहवालात देण्यात आला आहे.

2022 मधील उष्णतेच्या लाटा  
'जागतिक वसुंधरा दिना'च्या निमित्ताने प्रसिद्ध झालेल्या या अहवालात 2022 मधील तीव्र उष्णतेच्या घटनांचा संदर्भ देण्यात आला आहे. त्या वर्षी पंजाब, हरियाणा, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि बिहारसह भारतातील 1/3 हून अधिक राज्यांमध्ये तापमानात असामान्य वाढ झाली होती. याचा परिणाम केवळ गहू किंवा तांदळावरच नाही, तर फळे, भाजीपाला, पशुधन आणि कुक्कुटपालनावरही झाला होता. उच्च तापमान आणि पावसाची कमतरता यामुळे भारताच्या उत्तर आणि मध्य भागातील कृषी उत्पादनाचे मोठे नुकसान झाले होते, याचे सविस्तर विश्लेषण यात करण्यात आले आहे.

या वर्षी पावसाची ओढ आणि वाढते तापमान
हा अहवाल अशा वेळी समोर आला आहे जेव्हा यंदाच्या मान्सून हंगामात (जून ते सप्टेंबर) देशभरात पाऊस 'सरासरीपेक्षा कमी' पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. WMO च्या व्याख्येनुसार, उष्णतेची लाट ही केवळ दिवसाचे तापमान वाढणे नव्हे, तर रात्रीही तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची स्थिती असते. ही स्थिती काही दिवसांपासून ते काही महिन्यांपर्यंत टिकू शकते, ज्यामुळे जमिनीतील ओलावा कमी होऊन पिके करपून जाण्याचे प्रमाण वाढते.

हेही वाचा – Vaishno Devi Shrine : वैष्णो देवी मंदिराला दान दिलेली 95 टक्के चांदी खोटी, कॅडमियम पदार्थ असल्याने कॅन्सरचा धोका अधिक

तज्ज्ञांचे मत आणि भविष्यातील आव्हाने
WMO च्या सरचिटणीस सेलेस्टे साउलो यांनी म्हटले आहे की, "सध्याची कृषी-आधारित अन्नप्रणाली ज्या परिस्थितीत कार्यरत आहे, त्या परिस्थितीचे स्वरूप आता 'अति-उष्णता' अधिक ठरवत आहे." गेल्या 50 वर्षांत जगभरात तीव्र उष्णतेच्या घटनांमध्ये वेगाने वाढ झाली आहे. भविष्यात यामुळे केवळ मानवी आरोग्यच नाही, तर संपूर्ण परिसंस्था आणि अन्नपुरवठा साखळीला वाढता धोका निर्माण होत असल्याचे अहवालात अधोरेखित करण्यात आले आहे. त्यामुळे हवामान बदलाशी जुळवून घेणाऱ्या शेती पद्धतीचा अवलंब करणे आता अनिवार्य झाले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number