Monday, March 09, 2026 09:06:10 AM

Holi Special Trains: होळीसाठी रेल्वेचं स्पेशल गिफ्ट! यंदा धावणार 1,409 विशेष गाड्या; कन्फर्म तिकीट मिळणं होणार सोपं, पाहा यादी

रेल्वेने यंदा प्रवाशांच्या सोयीसाठी विशेष गाड्यांच्या संख्येत मोठी वाढ केली आहे. यामुळे रेल्वे स्थानकांवरील गर्दीचे व्यवस्थापन करणे आणि प्रवाशांना कन्फर्म सीट मिळवून देणे रेल्वेला शक्य होईल.

holi special trains होळीसाठी रेल्वेचं स्पेशल गिफ्ट यंदा धावणार 1409 विशेष गाड्या कन्फर्म तिकीट मिळणं होणार सोपं पाहा यादी

Holi Special Trains : होळीच्या सणाला आपल्या गावी जाण्याचे नियोजन करणाऱ्या प्रवाशांसाठी भारतीय रेल्वेने आनंदाची बातमी दिली आहे. सण-उत्सवाच्या काळात रेल्वे गाड्यांना होणारी प्रचंड गर्दी आणि लांबच लांब वेटिंग लिस्ट लक्षात घेऊन रेल्वे बोर्डाने यंदा कंबर कसली आहे. 2026 मध्ये रेल्वेने विक्रमी 1,409 होळी स्पेशल गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे मुंबई, पुणे, दिल्ली आणि बंगळुरूसारख्या मोठ्या शहरांतून उत्तर प्रदेश आणि बिहारकडे जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून सुखकर प्रवासाची खात्री मिळणार आहे.

गेल्या वर्षाच्या तुलनेत मोठी वाढ
रेल्वेने यंदा प्रवाशांच्या सोयीसाठी विशेष गाड्यांच्या संख्येत मोठी वाढ केली आहे. गेल्या वर्षी होळीच्या निमित्ताने 1,144 विशेष गाड्या चालवण्यात आल्या होत्या. यंदा या संख्येत 265 गाड्यांची भर घालून ती 1,409 वर नेण्यात आली आहे. विशेषतः पूर्व उत्तर प्रदेश आणि बिहारमधील प्रवाशांसाठी 'ईस्ट सेंट्रल रेल्वे' (ECR) महत्त्वाची भूमिका बजावणार असून, या झोनमार्फत 285 विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत. यामुळे रेल्वे स्थानकांवरील गर्दीचे व्यवस्थापन करणे आणि प्रवाशांना कन्फर्म सीट मिळवून देणे रेल्वेला शक्य होईल.

हेही वाचा - Train Ticket Price Cut : रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा; 'या' 10 गाड्यांचे तिकीट होणार स्वस्त

कोणता रेल्वे झोन किती गाड्या चालवणार?
प्रवाशांची वाढती मागणी पाहता विविध रेल्वे झोनने आपल्या स्तरावर गाड्यांचे नियोजन केले आहे:
पश्चिम रेल्वे (Western Railway): सर्वाधिक 231 विशेष गाड्या.
सेंट्रल रेल्वे (Central Railway): 209 विशेष गाड्या.
दक्षिण मध्य रेल्वे (South Central Railway): 160 विशेष गाड्या.
उत्तर रेल्वे (Northern Railway): 108 विशेष गाड्या.
उत्तर पश्चिम रेल्वे (North Western Railway): 71 विशेष गाड्या.

याव्यतिरिक्त इतर झोनमधूनही गरजेनुसार विशेष फेऱ्यांचे आयोजन करण्यात आले आहे.

या मुख्य शहरांना जोडणार विशेष गाड्या
होळी स्पेशल गाड्या प्रामुख्याने पाटणा, दिल्ली, मुंबई, पुणे, बेंगळुरू आणि हावडा यांसारख्या मोठ्या शहरांना उत्तर प्रदेश आणि बिहारमधील प्रमुख शहरांशी जोडतील. रेल्वेने जाहीर केलेल्या काही विशेष मार्गांमध्ये सोगरिया-दानापूर, राणी कमलापती-दानापूर, राणी कमलापती-अगरतळा आणि हापा-नाहरलगुन या लांब पल्ल्याच्या गाड्यांचा समावेश आहे. या गाड्यांमुळे महानगरांमध्ये कामासाठी असलेल्या नागरिकांना सणासाठी आपल्या घरी वेळेत पोहोचता येईल. प्रवाशांनी अधिकृत संकेतस्थळ किंवा ॲपवरून या गाड्यांचे वेळापत्रक तपासून आपले बुकिंग तातडीने करावे, असे आवाहन रेल्वेने केले आहे.

हेही वाचा - Sleeper Vande Bharat Train: रेल्वेच्या ताफ्यात येणार 260 वंदे भारत स्लीपर गाड्या; रेल्वेमंत्र्यांनी उलगडला आगामी प्रकल्पांचा ''नकाशा''


सम्बन्धित सामग्री