Rupee Vs Dollar: RBI चा ‘मास्टरस्ट्रोक’; बँकांवर घातली मोठी मर्यादा अन् रुपया एका दिवसात 1.15 रुपयांनी वधारला; डॉलरला मोठा झटका

रुपयावरील दबाव वाढण्यामागे अनेक कारणे होती. पश्चिम आशियातील तणावामुळे ऊर्जा दर वाढले, तसेच परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून मोठ्या प्रमाणात पैसे काढले.

Rupee Vs Dollar: RBI चा ‘मास्टरस्ट्रोक’; बँकांवर घातली मोठी मर्यादा अन् रुपया एका दिवसात 1.15 रुपयांनी वधारला; डॉलरला मोठा झटका

नवी दिल्ली: डॉलरच्या तुलनेत सतत घसरत असलेल्या रुपयाला अखेर दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसांत रुपया विक्रमी नीचांकी पातळीवर पोहोचला होता. मात्र आज सोमवारी बाजार उघडताच रुपया एका दिवसात सुमारे 1.15 रुपयांनी मजबूत झाला. या अचानक झालेल्या मजबुतीमागे भारतीय रिझर्व्ह बँक (Reserve Bank of India, RBI) चा कडक निर्णय कारणीभूत ठरला आहे.

RBI ने बँकांना डॉलर-रुपया व्यवहारातील त्यांची ‘नेट ओपन पोझिशन’ कमी करण्याचे आदेश दिले आहेत. यापूर्वी बँकांना त्यांच्या टियर-1 भांडवलाच्या 25 टक्क्यांपर्यंत डॉलरची खुली पोझिशन ठेवण्याची मुभा होती. त्यामुळे अनेक बँका मोठ्या प्रमाणावर डॉलर होल्ड करत होत्या आणि रुपयावर दबाव वाढत होता. आता RBI ने ही मर्यादा दररोज 100 मिलियन डॉलरपर्यंत आणली आहे.

या निर्णयामुळे बँकांना मोठ्या प्रमाणात डॉलर विकून रुपया खरेदी करावा लागणार आहे. अंदाजानुसार सुमारे 30 ते 40 बिलियन डॉलरची पोझिशन कमी करावी लागेल. यामुळे बाजारात रुपयाची मागणी वाढून त्याला तात्काळ बळ मिळाले आहे.

हेही वाचा: Nitish Kumar Resigns: बिहारच्या राजकारणात 'नितीश पर्व' संपणार? मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा

रुपयावरील दबाव वाढण्यामागे अनेक कारणे होती. पश्चिम आशियातील तणावामुळे ऊर्जा दर वाढले, तसेच परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून मोठ्या प्रमाणात पैसे काढले. यामुळे रुपया 94.82 या नीचांकी पातळीपर्यंत घसरला. RBI यापूर्वी विदेशी चलन साठ्यातून डॉलर विकून परिस्थिती सांभाळत होता, मात्र त्यामुळे साठ्यात मोठी घट झाली आहे.

याच पार्श्वभूमीवर RBI ने थेट हस्तक्षेप करण्याऐवजी बँकांच्या व्यवहारांवर नियंत्रण आणण्याचा मार्ग निवडला. या निर्णयामुळे रुपयावरील सट्टेबाजी कमी होण्याची शक्यता आहे आणि चलनातील अस्थिरताही कमी होईल. मात्र काही बँकांनी या नियमासाठी मुदतवाढ किंवा सवलत देण्याची मागणी केली आहे, कारण इतक्या कमी वेळेत पोझिशन कमी केल्यास त्यांना तोटा सहन करावा लागू शकतो.

एकूणच, RBI चा हा निर्णय रुपयासाठी तात्पुरता दिलासा देणारा ठरत आहे. मात्र दीर्घकालीन स्थैर्यासाठी कच्च्या तेलाचे दर, जागतिक आर्थिक परिस्थिती आणि परदेशी गुंतवणुकीचा ओघ हे घटक निर्णायक ठरणार आहेत. तज्ज्ञांच्या मते, हा निर्णय गेल्या दशकातील सर्वात कठोर उपायांपैकी एक असून यामुळे चलन बाजारात स्थिरता येण्याची शक्यता आहे. 

हेही वाचा: Terror Module Exposed: लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी शब्बीर अहमद गजाआड; ISI च्या इशाऱ्यावर भारताविरुद्ध मोठ्या कटाचा डाव उघड

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number