Share Market Today: कालच्या पडझडीनंतर सेन्सेक्सला मिळाला ‘बुस्टर’, गुंतवणूकदारांच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू

पश्चिम आशियातील इराण-इस्रायल तणावाच्या पार्श्वभूमीवरही 10 मार्च रोजी भारतीय शेअर बाजाराने सकारात्मक सुरुवात केली.

Share Market Today: कालच्या पडझडीनंतर सेन्सेक्सला मिळाला ‘बुस्टर’, गुंतवणूकदारांच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू

मुंबई: पश्चिम आशियातील इराण–इस्रायल संघर्षाच्या छायेतही भारतीय शेअर बाजाराने मंगळवारी सकारात्मक सुरुवात केली. मंगळवार, 10 मार्च रोजी आठवड्याच्या दुसऱ्या व्यवहार दिवशी प्रमुख निर्देशांक बीएसई सेन्सेक्स (बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज सेन्सेक्स) आणि एनएसई निफ्टी 50 (नॅशनल स्टॉक एक्स्चेंज निफ्टी 50) हे दोन्ही हिरव्या निशाणावर उघडले. जागतिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवरही गुंतवणूकदारांनी सावध आशावाद दाखवल्याचे चित्र दिसून आले.

30 समभागांचा बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 809.57 अंकांची म्हणजेच सुमारे 1.04 टक्क्यांची वाढ घेऊन उघडला. बाजाराची सुरुवात 78,375.73 या पातळीवर झाली. त्याचवेळी एनएसई निफ्टी 50 निर्देशांकातही चांगली तेजी दिसून आली. निफ्टी 252.75 अंकांनी म्हणजेच 1.05 टक्क्यांनी वाढत 24,280.80 या स्तरावर उघडला.

सकाळी सुमारे नऊ वाजून 20 मिनिटांपर्यंत बाजारात तेजी कायम होती. त्या वेळी सेन्सेक्स सुमारे 489 अंकांनी वाढून 78,055 या स्तरावर व्यवहार करत होता. तर निफ्टी 163 अंकांच्या वाढीसह 24,191 या पातळीवर व्यवहार करताना दिसत होता. जागतिक बाजारातील हालचाली आणि गुंतवणूकदारांचा सावध दृष्टिकोन यांचा परिणाम भारतीय बाजारावरही दिसत असल्याचे विश्लेषकांचे मत आहे.

हेही वाचा: Iran Israel US War: 'मोदींचा एक फोनही युद्ध थांबवू शकतो'; यूएईच्या राजदूतांचे मोठे विधान, इराण-इस्रायल वादात भारताची भूमिका कळीची?

बीएसई सेन्सेक्स मधील समभागांमध्ये काही कंपन्यांनी चांगली कामगिरी नोंदवली. इंडिगो, एशियन पेंट्स, टायटन, लार्सन अँड टुब्रो (एल अँड टी) आणि टाटा स्टील हे समभाग प्रमुख वाढीच्या यादीत होते. दुसरीकडे रिलायन्स इंडस्ट्रीज, भारती एअरटेल, पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन आणि टेक महिंद्रा यांच्या समभागांमध्ये घसरण दिसून आली.

दरम्यान, याच्या आधीच्या दिवशी म्हणजे सोमवार, 9 मार्च रोजी भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाली होती. त्या दिवशी प्रमुख निर्देशांक लाल निशाणावर बंद झाले होते. बीएसई सेन्सेक्स मध्ये 1,352.74 अंकांची म्हणजेच 1.71 टक्क्यांची घसरण झाली आणि तो 77,566.16 वर बंद झाला. तर एनएसई निफ्टी 50 निर्देशांक 422.40 अंकांनी म्हणजेच 1.73 टक्क्यांनी घसरून 24,028.05 या स्तरावर बंद झाला होता.

सोमवारी सेन्सेक्समधील काही समभागांनी मात्र सकारात्मक कामगिरी केली होती. रिलायन्स, सन फार्मा, टेक महिंद्रा आणि एचसीएल टेक हे त्या दिवशीचे प्रमुख वाढीचे समभाग होते. तर मारुती सुझुकी, महिंद्रा अँड महिंद्रा, स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय), इंडिगो आणि अदानी पोर्ट्स या कंपन्यांच्या समभागांमध्ये घसरण दिसून आली आहे.

त्याच दिवशी निफ्टी 100, निफ्टी बँक, निफ्टी ऑटो, निफ्टी एफएमसीजी, निफ्टी स्मॉलकॅप 100 आणि निफ्टी मिडकॅप 100 या निर्देशांकांमध्ये घसरण नोंदवली गेली होती, तर निफ्टी आयटी निर्देशांकातील समभागांनी काहीशी तेजी दाखवली. एकूणच, जागतिक घडामोडी आणि मध्यपूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजारात अस्थिरता कायम असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.

Disclaimer : शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीची आहे. नियम व अटी काळजीपूर्वक वाचा. जय महाराष्ट्र न्यूज कोणत्याही नफ्या-तोट्यास जबाबदार नाही. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या!

हेही वाचा: Gold Silver Rate Today: सलग दुसऱ्या दिवशी सोनं स्वस्त, चांदी मात्र जैसे थे; जाणून घ्या आजचे तुमच्या शहरातील दर

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number