Coal Mine Gas Explosion: कोळसा खाणीत भीषण स्फोट, 90 कामगारांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता

शुक्रवारी रात्री उशिरा खाणीने कार्बन मोनॉक्साईडचा इशारा दिल्यानंतर ही घटना घडली. स्फोटाच्या वेळी खाणीत २४७ कामगार होते.

Coal Mine Gas Explosion: कोळसा खाणीत भीषण स्फोट, 90 कामगारांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता

मध्य चीनच्या शांक्सी प्रांतातील एका कोळसा खाणीत झालेल्या स्फोटात किमान 90 जणांचा मृत्यू झाला आहे. बीजिंगपासून सुमारे ५२० किमी नैऋत्येस असलेल्या किनयुआन काउंटीमध्ये शुक्रवारी हा गॅस स्फोट झाला, असे सरकारी वृत्तसंस्था शिन्हुआने वृत्त दिले आहे. शुक्रवारी रात्री उशिरा खाणीने कार्बन मोनॉक्साईडचा इशारा दिल्यानंतर ही घटना घडली. स्फोटाच्या वेळी खाणीत २४७ कामगार होते.
 
ताज्या माहितीनुसार, खाणीतून कामगारांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गेल्या दशकातील ही सर्वात भीषण कोळसा खाण दुर्घटना आहे. अलिकडच्या वर्षांत चीनने आपल्या सुरक्षाविषयक कामगिरीत सुधारणा केली असली तरी, तेथील मृतांची संख्या जास्तच आहे.

चीनचे अध्यक्ष शी जिनिपिंग यांनी तात्काळ बचावकार्य सुरू करण्यास सांगितले. या घटनेला कारणीभूत असलेल्या आणि सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. दरम्यान, याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी संबंधित खाण व्यवस्थापक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना अटकही केली आहे.

सरकारी माध्यमांनी असेही वृत्त दिले आहे की, उपपंतप्रधान झांग गुओकिंग आणि स्थानिक अधिकारी आपत्कालीन मदतकार्याचे निर्देशन करण्यासाठी घटनास्थळी उपस्थित होते. शान्शी हा चीनमधील सर्वात मोठा कोळसा उत्पादक प्रांत आहे. गेल्या महिन्यात, लुलियांग येथे झालेल्या आणखी एका अपघातात चार खाण कामगारांचा मृत्यू झाला होता.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number