Sunday, November 16, 2025 05:20:44 PM

Lenskart IPO: गुंतवणूकदारांनो तयार राहा! 'या' दिवशी उघडणार लेन्सकार्टचा IPO

कंपनीने आपल्या IPO साठी 382 ते 402 प्रति शेअर असा किंमत बँड निश्चित केला आहे. या माध्यमातून लेन्सकार्ट 7,278 कोटी रुपये उभारण्याचे उद्दिष्ट ठेवत आहे.

lenskart ipo गुंतवणूकदारांनो तयार राहा या दिवशी उघडणार लेन्सकार्टचा ipo

Lenskart IPO: भारताची आघाडीची चष्मा ब्रँड कंपनी लेन्सकार्ट (Lenskart) लवकरच शेअर बाजारात पदार्पण करणार आहे. गुंतवणूकदारांमध्ये या IPO बद्दल मोठी उत्सुकता असून, कंपनीने अखेर आपल्या 7,278 कोटींच्या सार्वजनिक इश्यूचा किंमत जाहीर केली आहे.

IPO कधी उघडणार?

लेन्सकार्टचा IPO 31 ऑक्टोबर 2025 रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडेल आणि 4 नोव्हेंबरपर्यंत गुंतवणूकदारांना अर्ज करता येईल. शेअर वाटप 6 नोव्हेंबर रोजी अंतिम होईल, तर 10 नोव्हेंबर रोजी कंपनीचे शेअर्स NSE आणि BSE वर सूचीबद्ध होतील.

हेही वाचा - 'Trump Tarrif'मुळे भारताच्या 'केसालाही धक्का' लागणार नाही; IMF च्या अहवालाने अमेरिकेला दिला मोठा झटका!

किंमत बँड आणि एकूण मूल्य

कंपनीने आपल्या IPO साठी 382 ते 402 प्रति शेअर असा किंमत बँड निश्चित केला आहे. या माध्यमातून लेन्सकार्ट 7,278 कोटी रुपये उभारण्याचे उद्दिष्ट ठेवत आहे.

IPO स्ट्रक्चर

QIBs (संस्थात्मक गुंतवणूकदार) - 75 टक्के शेअर्स राखीव
NIIs (नॉन-इन्स्टिट्यूशनल गुंतवणूकदार) -15 टक्के
किरकोळ गुंतवणूकदार (Retail) - 10 टक्के
कंपनी आपल्या पात्र कर्मचाऱ्यांना प्रति शेअर 19 ची सूट देखील देणार आहे.

लॉट साईज आणि गुंतवणूक रक्कम

गुंतवणुकदारांना किमान अर्ज 37 शेअर्ससाठी करता येईल. म्हणजेच गुंतवणुकीची किमान रक्कम 14,874 असेल. मोठ्या गुंतवणुकीसाठी 37 च्या पटीत शेअर्स खरेदी करता येतील. या IPO मध्ये कंपनी नवीन शेअर्स जारी करणार आहे. तसेच 5,128 कोटींच्या विक्री ऑफर (OFS) अंतर्गत काही प्रवर्तक आणि गुंतवणूकदार आपला हिस्सा कमी करणार आहेत.

हेही वाचा - CSIR UGC NET: यूजीसी नेट परीक्षेसाठी एनटीएकडून अंतिम मुदत जाहीर, उमेदवारांनी वेबसाइटवर अर्ज आजच करावा

दरम्यान, OFS मध्ये विक्री करणाऱ्यांमध्ये पियुष बन्सल, नेहा बन्सल, अमित चौधरी, सुमित कपाही यांच्यासह SVF II Lightbulb (Cayman) Ltd, Schroders Capital, Kedara Capital Fund, Alpha Wave Ventures यांसारखे गुंतवणूकदार समाविष्ट आहेत. भारताबरोबरच, लेन्सकार्टने सिंगापूर, यूएई आणि आग्नेय आशिया या देशांमध्येही आपली मजबूत उपस्थिती निर्माण केली आहे. त्यामुळे या आयपीओकडे स्थानिकच नव्हे तर आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांचेही लक्ष लागले आहे.


सम्बन्धित सामग्री