Karnataka Accident: महामार्गावर मृत्यूचं तांडव! ट्रकच्या धडकेनंतर बस जळून खाक; 10 जणांचा मृत्यू

कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गावर ट्रक आणि स्लीपर बसच्या भीषण धडकेनंतर बसला आग लागली.

Karnataka Accident: महामार्गावर मृत्यूचं तांडव! ट्रकच्या धडकेनंतर बस जळून खाक; 10 जणांचा मृत्यू

Karnataka Accident:ख्रिसमसच्या सुट्ट्यांचा आनंद साजरा करण्यासाठी प्रवासाला निघालेल्या प्रवाशांवर कर्नाटकमध्ये भीषण दुर्घटना ओढावली आहे. चित्रदुर्ग जिल्ह्यातील हिरियुर तालुक्यात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 वर गुरुवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात किमान 10 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. ट्रक आणि खासगी स्लीपर कोच बस यांच्यात झालेल्या जोरदार धडकेनंतर बसला आग लागल्याने ही दुर्घटना घडली.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हिरियुरहून बेंगळुरूकडे जाणारा एक ट्रक अचानक चालकाचा ताबा सुटल्याने महामार्गावरील दुभाजक ओलांडून समोरून येणाऱ्या बसवर आदळला. ही बस बेंगळुरूहून शिवमोग्गाच्या दिशेने जात होती. धडक इतकी जबरदस्त होती की काही क्षणांतच बसने पेट घेतला आणि संपूर्ण वाहन आगीच्या ज्वाळांनी वेढले गेले.

बस स्लीपर कोच प्रकाराची असल्याने प्रवाशांना बाहेर पडण्यासाठी मर्यादित मार्ग उपलब्ध होते. आग वेगाने पसरल्याने अनेक प्रवासी बसमध्येच अडकून पडले. काही प्रवाशांनी प्रसंगावधान राखत काचा फोडून किंवा मदतीच्या सहाय्याने बाहेर पडण्याचा प्रयत्न केला, मात्र आगीची तीव्रता पाहता अनेकांना बाहेर पडता आले नाही.
 

अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. आगीचे लोळ दूरवरूनही दिसत होते. स्थानिक नागरिकांनी तत्काळ पोलिस आणि अग्निशमन दलाला माहिती दिली. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करण्यात आले. मात्र तोपर्यंत बस पूर्णपणे जळून खाक झाली होती.

पोलिसांच्या माहितीनुसार, जखमी प्रवाशांना तातडीने नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. काही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. मृतांचा अधिकृत आकडा अद्याप निश्चित झालेला नसून, अवशेषांची ओळख आणि पंचनाम्यानंतरच अंतिम संख्या जाहीर केली जाणार आहे.

हेही वाचा: Tamilnadu Accident News: तामिळनाडूत काळाचा घाला! बसचा टायर फाटल्याने भीषण अपघात; दोन लहान मुलांसह नऊ जणांचा मृत्यू

प्राथमिक तपासात ट्रक चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. चित्रदुर्गचे पोलीस अधीक्षक रणजित यांनी स्वतः घटनास्थळी भेट देत तपासाला गती देण्याचे आदेश दिले आहेत. या दुर्घटनेनंतर राष्ट्रीय महामार्गावर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती, जी नंतर हळूहळू पूर्ववत करण्यात आली.

या भीषण अपघातामुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून, सुरक्षित प्रवास आणि महामार्गावरील वाहतूक नियमांबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number