मुंबई : बॉलीवूड कलाकार सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांनी 15 जुलै रोजी त्यांच्या घरी कन्यारत्न झाल्याची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. आज त्या दोघांनी आपल्या चिमुकलीचं नावही जाहीर केलं आहे. सरायाह मल्होत्रा असं आपल्या लेकीचं नाव त्यांनी इन्स्टाग्राम पोस्टवर शेअर केलं आहे. कियारा आणि सिद्धार्थ यांनी नावासोबतच त्यांच्या लेकीचा सॉक्स घातलेला पायाचा फोटोही शेअर केला आहे. या निमित्ताने त्यांच्या मुलीची इन्स्टाग्रामवर पहिली छवी चाहत्यांना पाहायला मिळाली आहे. सरायाह हे नावदेखील खूप विशेष आहे. हिब्रू भाषेत सरायाह शब्दाचा अर्थ देवाचा आशिर्वाद असा होत असून हिंदीमध्ये सराया म्हणजे राजकुमारी असा अर्थ आहे. त्यामुळे आपल्या मुलीचं नाव ठेवताना दोघांनी वेगळेपण जपला असल्याचं यातून दिसून येत आहे.
कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांची शेरशाह चित्रपटातून जोडी प्रेक्षकांना खूपच आवडली होती. या चित्रपटानंतर त्यांनी 7 फेब्रुवारी 2023 रोजी लग्नगाठ बांधली. तर जुलै 2025 मध्ये त्यांच्या घरी लक्ष्मीचं आगमन झालं.