Gold Limit for Bank Locker : सुरक्षिततेसाठी अनेक लोक आपली मौल्यवान दागिने आणि सोने बँकेच्या लॉकरमध्ये (Bank Locker) ठेवतात. लॉकरमध्ये सोने ठेवणे हा एक चांगला आणि सुरक्षित पर्याय आहे, कारण चोरीची भीती नसते आणि गरज पडल्यास आपण ते कधीही काढू शकतो. बँक यासाठी शुल्क आकारते आणि त्या बदल्यात सुरक्षेची जबाबदारी घेते. मात्र, बँक लॉकरमध्ये आणि घरात सोने ठेवण्याबाबत काही नियम आहेत, ज्यांची माहिती असणे आवश्यक आहे.
घरात किती सोने ठेवण्याची आहे मर्यादा?
उत्पन्नकर कायद्यानुसार (Income Tax Act), घरात सोने ठेवण्यासाठी वेगवेगळ्या व्यक्तींसाठी मर्यादा निश्चित करण्यात आल्या आहेत:
- विवाहित महिला: फक्त 500 ग्रॅम पर्यंत सोने स्वतःजवळ ठेवू शकतात.
- अविवाहित महिला: यांच्यासाठी ही मर्यादा 250 ग्रॅम इतकी आहे.
- पुरुष (विवाहित/अविवाहित): पुरुष त्यांच्या नावावर केवळ 100 ग्रॅम सोने ठेवू शकतात.
उदाहरणार्थ, जर एकाच घरात एक विवाहित पुरुष आणि एक महिला राहत असेल, तर त्यांच्याकडे कायदेशीररित्या एकूण (500 ग्रॅम + 100 ग्रॅम) = 600 ग्रॅमपर्यंत सोने असू शकते.
हेही वाचा - UPI Transaction : लोकांनी खिशात रोख पैसे ठेवणंच थांबवलंय! ऑक्टोबरमध्ये UPI ने मोडले सर्व रेकॉर्ड; 20 अब्जाहून अधिक विक्रमी व्यवहार!
बँक लॉकरमध्ये सोने ठेवण्याची मर्यादा काय?
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) नियमांनुसार, बँक लॉकरमध्ये सोने ठेवण्यासाठी कोणतीही कमाल मर्यादा (Maximum Limit) ठरवण्यात आलेली नाही. बँक लॉकरमध्ये किती सोने ठेवावे, हे ग्राहकाच्या इच्छेवर आणि बँकेच्या धोरणांवर अवलंबून असते. तुम्ही लॉकरमध्ये किती सोने ठेवता, याबद्दल RBI ने कोणताही नियम बनवलेला नाही. बँक तुम्हाला लॉकरमध्ये ठेवलेल्या वस्तू आणि त्याचे कारण विचारू शकत नाही, जोपर्यंत तुम्ही त्यात कोणतीही अवैध (Illegal) वस्तू ठेवली नसेल.
महत्त्वाची अट: तुमच्याकडे लॉकरमध्ये ठेवलेले सोने हे वैध मार्गाने खरेदी (Legally Purchased) केल्याचा पुरावा (उदा. बिल/पावती) असणे आवश्यक आहे.
लॉकरसाठी 'प्राधान्य यादी' (Priority List)
दिवाळीनंतर लागू झालेल्या नवीन बँकिंग नियमांनुसार, आता लॉकर उघडणाऱ्या व्यक्तीला 'प्राधान्य यादी' (Priority List) देणे अनिवार्य करण्यात आले आहे. याचा उद्देश सुरक्षेला अधिक बळकट करणे आणि भविष्यात कोणत्याही प्रकारचा कायदेशीर वाद (Legal Dispute) टाळणे आहे. लॉकर घेताना ग्राहकाला बँकेला लेखी स्वरूपात हे कळवावे लागेल की, त्यांच्या मृत्यूनंतर लॉकर उघडण्याचा अधिकार कोणाकडे असेल.
या यादीनुसार, पहिल्या क्रमांकावर ज्याचे नाव असेल त्यालाच लॉकर उघडण्याचा हक्क मिळेल. त्याच्या गैर-हजेरीत दुसऱ्या व्यक्तीला, आणि अशा क्रमाने इतरांचा नंबर येईल.
हेही वाचा - New Financial Rules : आजपासून बदलले नियम; एलपीजी, बँक, जीएसटी आणि पेन्शनर्सवर थेट परिणाम