नवी दिल्ली, २० मे २०२४, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात सहा राज्य आणि दोन केंद्रशासित प्रदेशांतील ४९ मतदारसंघांमध्ये मतदान झाले. पश्चिम बंगालमध्ये सर्वात जास्त तर महाराष्ट्रात सर्वात कमी मतदान झाले. राज्यात सर्वात जास्त दिंडोरीत तर सर्वात कमी मतदान कल्याण लोकसभा मतदारसंघात झाले.
मतदानाची टक्केवारी
भारत ५७.८२
बिहार ५३.०७
जम्मू काश्मीर ५५.४९
झारखंड ६३.०६
लडाख ६८.४७
महाराष्ट्र ४९.६९ - सर्वात कमी
ओडिशा ६१.२७
उत्तर प्रदेश ५७.७९
पश्चिम बंगाल ७३.०६ - सर्वात जास्त
महाराष्ट्र ४९.६९
भिवंडी ४९.४३
धुळे ४९.९७
दिंडोरी ५७.९५ - सर्वात जास्त
कल्याण ४३.०४ - सर्वात कमी
उत्तर मुंबई ४६.९१
उत्तर मध्य मुंबई ४७.४६
ईशान्य मुंबई ४९.३७
वायव्य मुंबई ४९.७९
दक्षिण मुंबई ४५.२४
दक्षिण मध्य मुंबई ४९.३९
नाशिक ५१.१६
पालघर ५५.२१
ठाणे ४९.८१