Friday, December 05, 2025 02:22:18 AM

Ladki Bahin Yojana Update : बहिणींनो तयार व्हा! योजनेबद्दल मोठ्या घोषणेची शक्यता

या तारखेपर्यंत इकेवायसी न केल्यास लाडकी बहीण योजनेचा फायदा मिळणं बंद होणार आहे. मात्र आता अशातच आता लाडकी बहीण बाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.

ladki bahin yojana update  बहिणींनो तयार व्हा  योजनेबद्दल मोठ्या घोषणेची शक्यता

महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजनेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे. या योजनेमध्ये पात्र महिलांना दर महिन्याला बँक अकाउंटमध्ये १५०० रुपये जमा होतात. हा फायदा कायमस्वरूपी मिळत राहावा यासाठी सरकारने लाडक्या बहिणींना ई-केवायसी करणे अनिवार्य केले आहे. १८ नोव्हेंबर २०२५ ही अंतिम तारीख दिली असून, या तारखेपर्यंत इकेवायसी न केल्यास लाडकी बहीण योजनेचा फायदा मिळणं बंद होणार आहे. मात्र आता अशातच आता लाडकी बहीण बाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. 

महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहिणी योजनेचा अनेक महिला अनधिकृतपणे फायदा घेत असल्याचे निदर्शनास आलं आहे. यावर उपाय म्हणून इकेवायसी बंधनकारक करण्यात आली. मात्र केवायसी करण्यासाठी 18 नोव्हेंबर ही अंतिम तारीख आहे. अशातच आताच  केवायसीसाठी अवघे तीन दिवस शिल्लक असताना अजूनही तब्बल 1.3 कोटी महिलांनी केवायसी केली नसल्याचं समोर आलं आहे. 'नवभारत टाइम्स'च्या या वृत्तानुसार राज्यात या योजनेच्या एकूण लाभार्थी महिलांची संख्या 2.35 कोटी इतकी आहेत, त्यातील 1.3 कोटी महिलांची केवायसी अद्यापही बाकी आहे.

हेही वाचा- Bihar Election 2025 : बिहार निवडणूक निकाल – एक्झिट पोलही ठरले अचूक 

मोठ्या संख्येने अजून इकेवायसी करणे बाकी असल्याने सरकार आता या प्रक्रियेमध्ये वाढ करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र याबद्दलची अजून कोणतीही अधिकृत घोषणा झाली नाही आहे. मात्र यामुळे लाडक्या बहिणींना दिलासा मात्र नक्कीच मिळाला आहे. दरम्यान आता राज्यभरात निवडणुकांचे वारे वाहत आहेत. त्यामुळे या योजनेबद्दल कोणताही निर्णय सरकार घेईल असे वाटत आहे. मात्र हि योजना बंद होणार नाही असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी स्पष्ट केले आहे. 


सम्बन्धित सामग्री