नवी दिल्ली : नरेंद्र मोदी रविवारी संध्याकाळी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. मोदींच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील सहा खासदारांना संधी मिळणार असल्याचे सूत्रांकडून समजते. भाजपाच्या नितीन गडकरी, पीयूष गोयल, रक्षा खडसे, मुरलीधर मोहोळ या चार जणांना तर शिवसेनेच्या प्रतापराव चिखलीकर आणि रिपाईं आठवले गटाच्या रामदास आठवले यांना मंत्रिमंडळात सहभागी करून घेतले जाणार आहे. गडकरींकडे पुन्हा एकदा रस्ते मंत्रालय तर पीयूष गोयल यांच्याकडे वाणिज्य मंत्रालयाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. मुरलीधर मोहोळ यांना राज्यमंत्रीपदाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. रक्षा खडसे सलग तिसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आल्या आहेत. यामुळे त्यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार हे निश्चित आहे. पण त्या कॅबिनेट मंत्री असतील की राज्यमंत्री हे अद्याप समजलेले नाही. रामदास आठवलेंकडे सामाजिक न्याय खाते आणि चिखलीकरांकडे अवजड उद्योग मंत्रालय दिले जाण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रातील सहा खासदारांचा मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता : नितीन गडकरी, पीयूष गोयल, रक्षा खडसे, मुरलीधर मोहोळ, प्रतापराव चिखलीकर, रामदास आठवले