Saturday, June 15, 2024 04:57:25 PM

Sugar Production
साखर उत्पादनात महाराष्ट्राची आघाडी

भारतात २०२४ मधील हंगामात सर्वाधिक साखर उत्पादन महाराष्ट्रात झाले आहे.

साखर उत्पादनात महाराष्ट्राची आघाडी

कोल्हापूर : भारतातील वेगवेगळ्या राज्यांनी २०२४ मधील हंगामात केलेल्या साखर उत्पादनाची आकडेवारी जाहीर झाली आहे. या आकडेवारीनुसार भारतात २०२४ मधील हंगामात सर्वाधिक साखर उत्पादन महाराष्ट्रात झाले आहे. महाराष्ट्रानंतर साखर उत्पादनात उत्तर प्रदेश हे राज्य दुसऱ्या क्रमांकावर आणि कर्नाटक तिसऱ्या क्रमांकावर आहे. नोव्हेंबर महिन्यात झालेला पाऊस आणि इथेनॉल निर्मितीवर घातलेले निर्बंध यामुळे महाराष्ट्रातील साखर उत्पादनात वाढ झाली.

साखर उत्पादन २०२४

महाराष्ट्र - २०७ साखर कारखाने - ११० लाख टन साखर उत्पादन
उत्तर प्रदेश - १२१ साखर कारखाने - १०३ लाख टन साखर उत्पादन
कर्नाटक - ७६ साखर कारखाने - ५२.६० लाख टन साखर उत्पादन
तामीळनाडू - ३० साखर कारखाने - १४.७५ लाख टन साखर उत्पादन
गुजरात - १७ साखर कारखाने - ९.२० लाख टन साखर उत्पादन


सम्बन्धित सामग्री