Friday, June 13, 2025 06:17:58 PM

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन

महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन मुंबई येथे गुरुवार, २७ जून ते शुक्रवार,  १२ जुलै २०२४ या कालावधीत होणार आहे.

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन

मुंबई : महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन मुंबई येथे गुरुवार, २७ जून ते शुक्रवार,  १२ जुलै २०२४ या कालावधीत होणार आहे. राज्याचा अर्थसंकल्प २८ जून रोजी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मांडण्यात येणार आहे. पावसाळी अधिवेशनात राज्याचे अर्थमंत्री अजित पवार महाराष्ट्राचा पूर्ण अर्थसंकल्प सादर करणार आहेत. याआधी लोकसभेची निवडणूक असल्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थमंत्र्यांनी हंगामी अर्थसंकल्प सादर केला होता. एकूण तेरा दिवस कामकाज चालणार आहे. शनिवार २९ जून २०२४ सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी विधिमंडळाचे कामकाज सुरू राहील.


सम्बन्धित सामग्री