फलटणमधील महिला डॉक्टरने स्वत:ला संपवलं आणि सर्वत्र एकच चर्चा सुरू झाली. आत्महत्या करण्यापूर्वी महिला डॉक्टरने हातावर सुसाइड नोट लिहिली होती. त्यामध्ये तिच्यावर झालेल्या अत्याचाराबद्दल लिहिले होते. तसेच आपल्यावर वरिष्ठांचा आणि पोलिसांचा दबाव असल्याची तिची तक्रारही समोर आली होती.
दरम्याने या प्रकरणी भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांचे दोन पीए, पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने याच्यावर आरोप करण्यात आला. गोपाळ बदनेने आपल्यावर चार वेळा बलात्कार केल्याचा आरोप महिला डॉक्टरने केला होता. त्याचप्रमाणे पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलण्यासाठी आपल्यावर वरिष्ठांचा आणि पोलिसांचा दबाव आल्याची तक्रारही तिने केली होती.
हे सर्व प्रकरण मोठ्या प्रमाणात तापले होते. अशातच आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉक्टर मृत्यूप्रकरणी राज्याच्या पोलीस महासंचालकांना निर्देश दिले आहेत. प्रकरणी एसआयटी (SIT) स्थापन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांना दिले आहेत.
महिला डॉक्टर मृत्यूचा तपास हा एका महिला आयपीएस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखालील एसआयटीकडून करण्यात येणार आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला कोणते वळण लागणार आहे. याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.