PM Modi on Maharashtra Election: महाराष्ट्रातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत महायुतीने मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाची दखल थेट केंद्रातून घेण्यात आली आहे. ‘महाराष्ट्र विकासाच्या बाजूने खंबीरपणे उभा आहे,’ अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील जनतेचे आभार मानले आहेत. भाजपने या निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकत नंबर 1 चा पक्ष होण्याचा मान मिळवला असून, महायुतीने 288 पैकी 200 पेक्षा जास्त जागांवर वर्चस्व गाजवले आहे.
पंतप्रधान मोदींकडून कार्यकर्त्यांचे कौतुक
विजयानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘नगर परिषद निवडणुकीत भाजप आणि महायुतीला मिळालेला हा कौल लोककेंद्रित विकासावर जनतेने दाखवलेला विश्वास आहे. आम्ही राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी नवीन ऊर्जेने काम करण्यास वचनबद्ध आहोत.’ तसेच, त्यांनी तळागाळातील भाजप आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे विशेष कौतुक केले.
Maharashtra stands firmly with development! Grateful to the people of Maharashtra for blessing the BJP and Mahayuti in the Municipal Council and Nagar Panchayat elections. This reflects trust in our vision of people-centric development. We remain committed to working with… https://t.co/X5jmfpb3M8 — Narendra Modi (@narendramodi) December 21, 2025
अमित शाह यांचा ‘विजयी’ संदेश
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या विजयाचे वर्णन पंतप्रधान मोदींच्या जनकल्याणकारी धोरणांचा विजय असे केले आहे. आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये ते म्हणाले, ‘हा विजय म्हणजे समाजातील सर्व घटकांच्या कल्याणासाठी एनडीए सरकारने केलेल्या कामाची पावती आहे.’ अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे अभिनंदन करत विजयाचा आनंद व्यक्त केला.
महाराष्ट्र नगर पंचायत व नगर परिषद के चुनाव में महायुति को प्रचंड समर्थन देने के लिए प्रदेश की जनता का आभार। यह विजय मोदी जी के नेतृत्व में NDA की केंद्र व राज्य सरकार के हर वर्ग के कल्याण के विजन पर जनता का आशीर्वाद है। इस जीत पर मुख्यमंत्री श्री @Dev_Fadnavis जी, उपमुख्यमंत्री… — Amit Shah (@AmitShah) December 21, 2025
भाजप ठरला सर्वात मोठा पक्ष
या निवडणुकीत महायुतीने विरोधकांचा धुव्वा उडवला आहे. महायुती आघाडीने राज्यातील 288 नगरपालिका संस्थांपैकी 200 हून अधिक जागा जिंकल्या आहेत. भाजप 118 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष बनला आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने आतापर्यंत 59 जागा जिंकल्या आहेत. त्याच वेळी, अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला (NCP) 37 जागा मिळाल्या आहेत. आगामी राजकीय समीकरणांसाठी हा निकाल अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.