Wednesday, February 18, 2026 06:35:09 PM

Malegaon Politics :मालेगाव महानगरपालिकेत सत्तास्थापनेचा सस्पेन्स; 43 नगरसेवक 'नॉट रिचेबल', इम्तियाज जलील आज घेणार मोठा निर्णय

एमआयएमचे (MIM) प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील हे आज दुपारी मालेगावच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या या दौऱ्याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

malegaon politics मालेगाव महानगरपालिकेत सत्तास्थापनेचा सस्पेन्स 43 नगरसेवक नॉट रिचेबल इम्तियाज जलील आज घेणार मोठा निर्णय

Malegaon Politics Update : मालेगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता सत्ता स्थापनेसाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. फोडाफोडीचे राजकारण टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून नवनिर्वाचित 43 नगरसेवकांना अज्ञात स्थळी रवाना करण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने इस्लाम पार्टी, समाजवादी पार्टी आणि काँग्रेसच्या नगरसेवकांचा समावेश आहे. सत्ता काबीज करण्यासाठी आकड्यांची जुळवाजुळव वेगाने सुरू असून, या सर्व नगरसेवकांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले आहे.

इम्तियाज जलील यांचा मालेगाव दौरा
एमआयएमचे (MIM) प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील हे आज दुपारी मालेगावच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या या दौऱ्याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असून, ते नवनिर्वाचित नगरसेवकांशी चर्चा करून गटनेत्याची अधिकृत घोषणा करणार आहेत. या बैठकीत कोणाचे नाव गटनेतेपदासाठी पुढे येते आणि सत्ता स्थापनेचा नेमका फॉर्म्युला काय असेल, याबाबतचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. जलील यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या बैठकीमुळे मालेगावच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

हेही वाचा - Chhatrapati Sambhajinagar : 'त्या' कथित ऑडिओ क्लिपबाबत आमदार नारायण कुचे यांचे स्पष्टीकरण; म्हणाले 'याप्रकरणी करणार अब्रू नुकसानीचा दावा'

महाविकास आघाडी आणि मित्रपक्षांची रणनीती
समाजवादी पार्टी, इस्लाम पार्टी आणि काँग्रेस या पक्षांनी एकत्र येत सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, 43 हा आकडा सत्ता स्थापनेसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. या नगरसेवकांमध्ये इस्लाम पार्टीचे उमेदवार मोठ्या संख्येने निवडून आले असून, त्यापैकीच एका नावावर गटनेते म्हणून शिक्कामोर्तब होण्याची चिन्हे आहेत. दुपारी होणाऱ्या बैठकीनंतर या महायुतीचे चित्र अधिक स्पष्ट होईल, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.

गटनेतेपदासाठी चढाओढ आणि उत्सुकता
मालेगावमध्ये सध्या 'किंग मेकर'च्या भूमिकेत असलेल्या इम्तियाज जलील यांच्या निर्णयावर सर्व काही अवलंबून आहे. गटनेतेपदासाठी इस्लाम पार्टीतील अनुभवी उमेदवारांचे नाव सध्या चर्चेत असले, तरी अंतिम घोषणा बैठकीनंतरच केली जाईल. महापालिकेची सत्ता राखण्यासाठी सर्वच पक्षांनी आपल्या नगरसेवकांना इतर पक्षांच्या संपर्कात जाण्यापासून रोखण्यासाठी ही फिल्डिंग लावली आहे. आज संध्याकाळपर्यंत मालेगाव महानगरपालिकेचा नवा कारभारी कोण असेल, यावरून पडदा उठण्याची शक्यता आहे.

 

हेही वाचा - Chhatrapati Sambhajinagar : वैजापुरात व्यापाऱ्यानं गळफास घेत संपवलं जीवन; 42 सेकंदांच्या व्हिडिओत मांडली व्यथा, 7 जणांवर गुन्हा दाखल


सम्बन्धित सामग्री