…आणि त्याने थेट वाघाच्या पिंजऱ्यात मारली उडी, पुढे जे घडलं ते वाचून व्हाल अवाक्; प्राणीसंग्रहालयातील थरारक घटना चर्चेत

यॉर्कशायरमधील एका प्राणीसंग्रहालयात वाघाच्या पिंजऱ्यात उडी मारल्यानंतर वाघाने केलेल्या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
wildlife park video viral
wildlife park video viral

Wildlife Park : यॉर्कशायरमधील एका प्राणीसंग्रहालयात वाघाच्या पिंजऱ्यात उडी मारल्यानंतर वाघाने केलेल्या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. शनिवारी दुपारी 1.30 च्या सुमारास ही घटना घडली. जेव्हा संबंधित व्यक्तीने डोनकास्टरजवळील ‘यॉर्कशायर वाइल्डलाइफ पार्क’मधील वाघाच्या पिंजऱ्यात प्रवेश केला आणि वाघाने त्याच्यावर हल्ला केला. घटनास्थळीच त्या व्यक्तीला मृत घोषित करण्यात आले, असे साउथ यॉर्कशायर पोलिसांनी सांगितले. तसेच त्याच्या कुटुंबीयांना याबद्दल सूचित करण्यात आले असल्याचेही त्यांनी नमूद केले. ऑनलाइन फिरणाऱ्या काही व्हिडिओंमध्ये पिंजऱ्यात एक वाघ त्या व्यक्तीवर पंजा मारताना आणि झटापट करताना दिसत आहे.

हेही वाचा : देवीची ज्योत घेऊन येणाऱ्या तीन तरुणांची जीवनज्योत विझली; आयशरने दुचाकीला दोन किमी फरफटत नेलं

पोलिसांच्या प्रवक्त्याने सांगितले की, वाघाने त्या व्यक्तीवर हल्ला केला आणि त्याला “गंभीर दुखापत” पोहोचवली. “तातडीची मदत देणारी पथके घटनास्थळी दाखल झाली. परंतु दुर्दैवाने वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी सर्वतोपरी प्रयत्न करूनही त्या व्यक्तीला घटनास्थळीच मृत घोषित करण्यात आले,” असे त्यांनी पुढे सांगितले. “वाघाच्या स्थितीबाबत पसरलेल्या अफवांच्या संदर्भात सांगायचे तर, या घटनेनंतर तो प्राणी सुरक्षित आणि कोणत्याही दुखापतीविना आपल्या पिंजऱ्यातच (एन्क्लोजरमध्ये) राहिला. तसेच यामुळे जनतेला कोणताही धोका नाही.” सोशल मीडियावर फिरत असलेले हल्ल्याचे ‘अस्वस्थ करणारे’ व्हिडिओ फुटेज शेअर न करण्याचे आवाहन संबंधित यंत्रणेने लोकांना केले आहे.

यॉर्कशायर वाइल्डलाइफ पार्कने सांगितले की, पिंजऱ्याच्या आत एक “गंभीर घटना” घडली आहे. एका निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, “आमच्या आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा त्वरित कार्यान्वित करण्यात आल्या आणि आपत्कालीन सेवा सध्या घटनास्थळी कार्यरत आहेत. नेमके काय घडले हे जाणून घेण्यासाठी आम्ही प्रशासनासोबत मिळून काम करत आहोत.” त्यांनी पुढे नमूद केले की, “अभ्यागत, कर्मचारी आणि प्राणी यांची सुरक्षा व कल्याण हीच आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे.”

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version