Cabinet Reshuffle : केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार; अमित शाह, नितीन गडकरींना मोठी बढती? महाराष्ट्रातील ‘या’ बंडखोर नेत्यांना थेट संधी मिळण्याची शक्यता

या संभाव्य बदलांविषयी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यात तब्बल 3 तास महत्त्वाची बैठक पार पडली आहे.

Cabinet Reshuffle : केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार; अमित शाह, नितीन गडकरींना मोठी बढती? महाराष्ट्रातील ‘या’ बंडखोर नेत्यांना थेट संधी मिळण्याची शक्यता

Modi Cabinet Reshuffle Upcoming : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा विस्तार आणि फेरबदल लवकरच होणार असून, दिल्लीत या संदर्भातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. आगामी पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर या नव्या विस्ताराची अधिकृत घोषणा होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. या मंत्रिमंडळ फेरबदलात काही प्रस्थापित नेत्यांना डच्चू देऊन त्यांच्या जागी नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार असून, महाराष्ट्राच्या वाट्याला अनेक महत्त्वाची मंत्रिपदे मिळण्याचा अंदाज आहे. या संभाव्य बदलांविषयी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यात तब्बल 3 तास महत्त्वाची बैठक पार पडली आहे.

नितीन गडकरी आणि अमित शाह यांच्या भूमिकेत मोठे बदल?
मिळालेल्या सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपची नवी टीम जवळपास तयार झाली असून यामध्ये पक्षातील सर्वोच्च नेत्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये मोठा खांदेपालट पाहायला मिळू शकतो. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या खांद्यावर एखादी मोठी आणि महत्त्वाची जबाबदारी सोपवून त्यांची पदोन्नती करू शकतात. याचसोबत, सर्वात मोठी बातमी म्हणजे अमित शाह यांचेही पद वाढण्याचे संकेत असून, त्यांना थेट देशाचे उपपंतप्रधान (डेप्युटी प्राइम मिनिस्टर) बनवले जाण्याची शक्यता आहे. या रणनीतीमध्ये देशाचे रेल्वे आणि अर्थ मंत्रालय यांसारख्या प्रमुख खात्यांमध्येही मोठे फेरबदल केले जाऊ शकतात.

हेही वाचा – Terrorists List: मोदी सरकारची UAPA अंतर्गत मोठी कारवाई; जैश आणि लष्करशी संबंधित 23 जण दहशतवादी म्हणून घोषित, पाहा संपूर्ण यादी

महाराष्ट्रातील नव्या चेहऱ्यांना मिळणार केंद्रात स्थान
या मंत्रिमंडळ विस्तारात महाराष्ट्रातील प्रादेशिक समीकरणे साधण्याचा मोठा प्रयत्न केला जाणार आहे. शिवसेना ठाकरे गटातून बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झालेल्या 6 खासदारांच्या पार्श्वभूमीवर, शिंदे गटाला केंद्रात तब्बल 3 मंत्रिपदे मिळण्याची चिन्हे आहेत. यामध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांचा थेट केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होऊ शकतो, अशी सूत्रांची खात्रीशीर माहिती आहे. याव्यतिरिक्त राज्यातील इतर प्रमुख नेते ओमराजे निंबाळकर आणि संजय जाधव यांच्याही गळ्यात केंद्रीय मंत्रिपदाची माळ पडू शकते, ज्यामुळे राज्यातील महायुतीला केंद्रात मोठी ताकद मिळेल.

पंजाब आणि उत्तर प्रदेश निवडणुकांवर विशेष लक्ष
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आगामी उत्तर प्रदेश आणि पंजाब विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच मोदी सरकारकडून हा संपूर्ण पॅटर्न आखला जात आहे. पंजाबमध्ये भाजपला बळकट करण्यासाठी आम आदमी पार्टीमधून मोठी बंडखोरी करून बाहेर पडलेले नेते राघव चड्ढा यांना देखील या विस्तारात केंद्रीय मंत्रिपद दिले जाण्याची शक्यता आहे. पंजाबमधील भाजपचा एक प्रमुख चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. एकूणच, या आगामी 'मेगा' विस्ताराच्या माध्यमातून काही जुन्या चेहऱ्यांना नारळ देत आगामी निवडणुका जिंकण्यासाठी भाजप आपली संपूर्ण नवी फळी मैदानात उतरवण्याच्या तयारीत आहे.

हेही वाचा – Instagram Controversial Ads: केंद्र सरकारचा मेटाला मोठा दणका; आक्षेपार्ह इंस्टाग्राम जाहिरातींप्रकरणी समन्स; 3 दिवसांत दुसऱ्यांदा नोटीस

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number