Saturday, October 12, 2024 08:51:40 PM

Modi Swearing in
असा होणार मोदींच्या शपथविधी

नरेंद्र मोदी रविवार ९ जून २०२४ रोजी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. हा शपथविधी दिल्लीत राष्ट्रपती भवनात संध्याकाळी सव्वासात वाजता सुरू होणार आहे.

असा होणार मोदींच्या शपथविधी

नवी दिल्ली : नरेंद्र मोदी रविवार ९ जून २०२४ रोजी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. हा शपथविधी दिल्लीत राष्ट्रपती भवनात संध्याकाळी सव्वासात वाजता सुरू होणार आहे. विकसित भारताचे प्रतिनिधी म्हणून शपथविधीला 'वंदे भारत'चे लोको पायलट आणि सहाय्यक लोको पायलट उपस्थित असतील. मोदींच्या शपथविधीला निवडक विदेशी पाहुणे आणि देशातले मान्यवर उपस्थित असतील. शपथविधीला सात ते आठ हजार मान्यवर उपस्थित असतील, अशी प्राथमिक माहिती आहे. रविवारी सर्वात आधी नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून शपथ घेतील. यानंतर मोदींच्या मंत्रिमंडळातील सदस्यांना राष्ट्रपती शपथ देतील. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मोदी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देणार आहेत. 

मोदींच्या शपथविधीला येणारे परदेशी पाहुणे

बांगलादेश - पंतप्रधान शेख हसीना
नेपाळ - पंतप्रधान पुष्प कमल दहल 
श्रीलंका -  राष्ट्राध्यक्ष रानिल विक्रमसिंघे
मालदीव - अध्यक्ष मोहम्मद मुइझू
भूतान - राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक
सेशेल्स - उपाध्यक्ष अहमद अफिफ 
मॉरिशस - पंतप्रधान प्रविंद जुगनाथ


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo