Saturday, July 20, 2024 12:42:51 PM

monsoon Session
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २७ जूनपासून सुरू करावे, अशी शिफारस राज्य शासनाने राज्यपालांना केली आहे.

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन

मुंबई : विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २७ जूनपासून सुरू करावे, अशी शिफारस राज्य शासनाने राज्यपालांना केली आहे. पावसाळी अधिवेशनात राज्याचे अर्थमंत्री अजित पवार महाराष्ट्राचा पूर्ण अर्थसंकल्प सादर करणार आहेत. याआधी लोकसभेची निवडणूक असल्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थमंत्र्यांनी हंगामी अर्थसंकल्प सादर केला होता. पावसाळी अधिवेशनाआधी बुधवार, २६ जून रोजी विधान परिषदेच्या चार मतदारसंघांसाठी मतदान होणार आहे. 

विधान परिषद निवडणूक - 

  1. मतदान - बुधवार २६ जून २०२४
  2. मतदानाची वेळ सकाळी ७.०० वाजल्यापासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत
  3. मतमोजणी सोमवार १ जुलै २०२४

भाजपाचे उमेदवार

  1. किरण शेलार - मुंबई पदवीधर
  2. शिवनाथ दराडे - मुंबई शिक्षक
  3. निरंजन डावखरे - कोकण पदवीधर

शिउबाठाचे उमेदवार

  1. अनिल परब - मुंबई पदवीधर
  2. ज. मो. अभ्यंकर - मुंबई शिक्षक
  3. संदीप घुळवे - नाशिक शिक्षक

काँग्रेसचे उमेदवार

  1. रमेश कीर - कोकण पदवीधर

सम्बन्धित सामग्री