पिंपरी चिंचवड : पाणी भरण्यासाठी गेलेल्या महिलेचा पाण्याच्या टाकीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पिंपरी चिंचवड शहरातील मोहन नगर परिसरातील दुर्गा रेसिडेन्सीमध्ये ही दुर्दैवी घटना घडली. आशा संजय गवळी (वय 52) असं मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. दुखद बाब म्हणजे 4 नोव्हेंबर रोजी आशा यांच्या मुलाच लग्न असून चार दिवस आधीच ही दुर्दैवी घटना घडली आहे. आज सकाळी पिण्याचे पाणी भरण्यासाठी टाकीजवळ गेली असता त्या दरम्यान त्यांचा तोल जाऊन त्या पाण्याच्या टाकीत पडल्या. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलाने मृतदेह पाण्याच्या टाकी बाहेर काढून शवविच्छेदन अहवालासाठी वाय सी एम हॉस्पिटलमध्ये पाठवला आहे. या घटनेने संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरावर शोककळा पसरली आहे.
हेही वाचा : Sanjay Raut : 'मी यातून लवकरच बाहेर पडेन...'; संजय राऊत यांनी स्वतःचं दिली प्रकृतीची माहिती, पंतप्रधान मोदींचेही मानले आभार
येत्या मंगळवार, 4 नोव्हेंबरला आशा यांच्या घरी त्यांच्या मुलाचा लग्नसोहळा आयोजित करण्यात आला होता. मात्र वरमाई म्हणून मिरवण्याचं स्वप्न पाहणाऱ्या आशा यांच्या अपघाती निधनाने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तसेच आईच्या जाण्याने मुलाचं मन हादरलं आहे. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.