मुंबई विमानतळ परिसरात आज तणावाचे वातावरण पाहायला मिळाले आहे. विमानतळावरील अथिक अनधिकृत मशिदीविरोधात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी जेल भरो आंदोलन केले आहे. टर्मिनल 2 जवळ असलेल्या मॅरियट हॉटेल या परिसरात हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता.
हातात फलक घेत कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी ही केली. विमानतळ परिसरातील ही अनधिकृत मशीद तातडीने पाडून टाकण्यात यावी, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केलेली आहे. हा विषय गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. आंदोलनामुळे परिसरात तणाव निर्माण झाल्याने पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता. सर्व परिस्थिती चिघळू नये म्हणून पोलिसांनी किरीट सोमय्या यांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे सध्या भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.