मुंबई : कसारा, आसनगाव, वासिंद, खडवली सह अजून एका परिसरातील लोकल प्रवाशांसाठी मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आलेली आहे. कल्याण-कसारा मार्गावर 15 डब्यांच्या लोकल सुरु करण्याच्या कामाला आता वेग आलेला आहे. टिटवाळा स्थानकातील अनेक महत्त्वाची कामे ही पूर्ण झाली असून सध्या फक्त प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाचे काम शेवटच्या टप्प्यात आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर या मार्गावर 15 डब्यांच्या लोकल सुरु करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
जाणून घ्या सविस्तर
टिटवाळा स्थानकात सप्टेंबरच्या सुरुवातीला विशेष ट्रॅफिक तसेच पॉवर ब्लॉक घेण्यात आलेला होता. याच कालावधीत इंजिनीअरिंग, ओव्हरहेड वायर, सिग्नल आणि टेलिकॉम विभागाने संयु्क्तपणे बरच कामे केली. रुळ, सिग्नल यंत्रणासह अनेक कामे आता पूर्ण झाली आहेत. सध्या स्थानकातील फलाटाची लांबी वाढवण्याचे काम सुरु आहे. साधारण 90 मीटरने प्लॅटफॉर्म वाढवण्यात येणार आहे, त्यासाठी प्री-फॅब्रिकेटेड सीमेंट बॉक्सचा वापर केला जाईल शिवाय छत उभारणीचे ही काम सुरु आहे. ही काम येत्या महिन्याभरात पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
हेही वाचा-LPG Gas Cylinder : सणासुदीच्या तोंडावर मोठा दिलासा! आता 6 सिलिंडर मोफत मिळणार; पण फक्त…
सध्याच्या स्थितीला कसारा, आसनगाव, वासिंद, खडवली, आंबिवली या स्थानकांवरील आवश्यक कामे जवळपासून पूर्ण झाली आहे, त्यामुळेच टिटवाळ्यातील काही कामे पूर्ण होताच कल्याण-कसारा मार्गावर 15 डब्यांच्या लोकलसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध होणार आहे.
मध्य रेलेच्या मुंबई उपनगरीय मार्गावर सध्या 15 डब्यांच्या लोकलच्या 54 फेऱ्या या सुरु आहेत. जुलै आणि ऑगस्ट 2026 मध्ये या फेऱ्यांमध्ये वाढ ही करण्यात आली होती. मुख्य म्हणजे सीएसएमटी-कर्जत आणि खोपोली मार्गावर या लोकल धावत आहेत. 12 डब्यांच्या लोकलमध्ये 3 डबे हे वाढवल्याने प्रवासी वाहून नेण्याची क्षमता देखील तब्बल 25 टक्क्यांनी वाढते, त्यामुळेच कल्याण-कसारा मार्गावर 15 डब्यांच्या लोकल सुरू झाल्यास गर्दीच्या वेळेत प्रवाशांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.