Saturday, January 18, 2025 06:42:37 AM

10 percent water reduction from the BMC
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा, पालिकेकडून 10 टक्के पाणीकपात

मुंबईकरांना 10 टक्के पाणीकपातीचा सामना करावा लागणार आहे.

मुंबईकरांनो पाणी जपून वापरा पालिकेकडून 10 टक्के पाणीकपात

मुंबई : मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे येथील न्यूमॅटिक गेट सिस्टीम मध्ये शनिवारी तांत्रिक बिघाड झाला असून महापालिकेतर्फे तातडीने दुरुस्ती काम हाती घेतले आहे. परिणामी 1 ते 5 डिसेंबर या कालावधीत मुंबईकरांना 10 टक्के पाणीकपातीचा सामना करावा लागणार आहे. मुंबई महानगरपालिकेमार्फत ठाणे व भिवंडी महानगरपालिकेस होणाऱ्या पाणीपुरवठ्यामध्येही कपात होणार आहे. दुरुस्तीची कामे 1 आणि 2 डिसेंबर रोजी होणार आहेत. त्यानंतर काही बाबींची तपासणी करून पाणीपुरवठा पुन्हा सुरळीत करण्यात येईल. नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून या कालावधीत पाणी काटकसरीने वापरावे व महानगरपालिकेला सहकार्य करावे असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

 

 

मुंबई महानगरपालिकेकडून त्यांच्या एक्स  सोशल मीडिया अकाऊंटवर याबाबतची अधिकृत माहिती देण्यात आली आहे. मुंबई पालिककडून पाणी पुरवठा करण्यात येणाऱ्या पिसे येथल न्यूमॅटिक गेट सिस्टिममध्ये 30 नोव्हेंरला बिघाड झाला आहे. हे तांत्रिक दुरूस्तीचे काम 1 डिसेंबर ते 2 डिसेंबर रोजी हाती घेण्यात येणार आहे. या तातडीच्या दुरुस्ती कामामुळे बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे मुंबई शहर - उपनगर, ठाणे व भिवंडी भागाला होणाऱ्या पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार आहे.  यामुळे 1 डिसेंबर ते 2 डिसेंबर दरम्यान मुंबई महापालिकेकडून मुंबई शहर आणि मुंबई उपनगर तसेच ठाणे व भिवंडी या भागातील पाणी पुरवठ्यात 10 टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे.  

 

मुंबई महापालिकेचे नागरिकांना आवाहन

नागरिकांना खबरदारीचा उपाय म्हणून 1 डिसेंबर ते 2 डिसेंबर या कालावधीत पाणी काटकसरीने व जपून वापरुन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे अशी विनंती पालिकेकडून करण्यात आली आहे.

 

 

 


सम्बन्धित सामग्री