Thursday, May 22, 2025 06:54:03 PM

बेस्ट बसच्या तिकीट दरवाढीला महापालिकेची मंजुरी

बेस्ट उपक्रमाला आर्थिक टंचाईतून बाहेर काढण्यासाठी बेस्ट बसच्या तिकीट दरात वाढ करण्याच्या निर्णयाला मुंबई महापालिकेने मंजुरी दिली आहे.

बेस्ट बसच्या तिकीट दरवाढीला महापालिकेची मंजुरी

मुंबई: मुंबई महापालिकेचा बेस्ट उपक्रम गेल्या काही काळापासून सातत्याने तोट्यात आहे. बेस्ट उपक्रमाला आर्थिक टंचाईतून बाहेर काढण्यासाठी बेस्ट बसच्या तिकीट दरात वाढ करण्याच्या निर्णयाला मुंबई महापालिकेने मंजुरी दिली आहे. यामुळे सर्वसामान्य मुंबईकरांच्या खिशाला कात्री लागणार आहे. बेस्ट बसच्या दरवाढीला मान्यता मिळाल्यामुळे सध्या बसचे किमान तिकीट दर पाच रुपयांऐवजी दहा रुपये होणार आहे. तर वातानुकूलित बसचा किमान दर सहा रुपयांवरुन बारा रुपये होणार आहे. मुंबई महापालिकेने या तिकीट दरवाढीला मंजुरी दिली आहे. वाढीव तिकीट दरवाढीची अंमलबजावणी तत्काळ केली जाणार आहे. त्यामुळे वाढत्या महागाईत आता मुंबईकरांच्या खिशाला आणखी कात्री लागणार आहे. मात्र या दरवाढीमुळे तोट्यात असलेल्या बेस्टच्या महसुलात वाढ होणार आहे.

बेस्ट उपक्रम गेल्या काही काळापासून तोट्यात सुरु आहे. त्यासाठी मुंबई महापालिकेकडून बेस्टच्या उपक्रमाला मदत केली जात होती. मात्र महापालिकेच्या मदतीच्या जोरावर बेस्ट उपक्रमाची आर्थिक घडी बसवणे कठीण होते. त्यामुळे बेस्ट उपक्रमाच्या महसुलवाढीसाठी इतरही उपाययोजना करणे आवश्यक आहे.

हेही वाचा : पाणी टंचाईच्या झळा, टँकरच्या फेऱ्या वाढल्या

बेस्ट बसची दरवाढ
बृहन्मुंबई महानगरपालिकेने बेस्ट बस दरवाढीला मंजुरी दिल्यानंतर या दरवाढीची तत्काळ अंमलबजावणी केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे वाढीव तिकीटदर प्रवाशांना आकारला जाणार आहे. विशेष म्हणजे सवलतीच्या दरात कोणतीही भाडेवाढ करण्यात आली नाही. त्यामुळे शालेय विद्यार्थी, दिव्यांग व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक, पत्रकार यांना सवलतीचे दर कायम ठेवण्यात आले आहेत.

किमान बस भाड्यात पाच रुपयांची वाढ झाली आहे तर पुढील टप्प्यानुसार भाडेवाढ करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे बेस्ट उपक्रमाच्या महसुलात 590 कोटी रुपयांचा महसूल जमा होणार आहे. सध्या बेस्टचे 30 हजार प्रवाशी आहेत. त्यांच्याकडून प्रवासी तिकीटाच्या माध्यमातून 845 कोटी रुपये महसूल जमा होता. तिकीट दरवाढीमुळे बेस्टच्या महसूलात वार्षिक 1400 कोटी रुपये जमा होणार असल्याची शक्यता आहे.


सम्बन्धित सामग्री