एका लाडाच्या हाकेने बदलली ओळख; विश्वनाथ पाटेकर कसे झाले ‘नाना’? नावामागची कहाणी आहे खास

Nana Patekar Real Name : नाना पाटेकर हे नाव आज घराघरात परिचित आहे; मात्र त्यांचं खरं नाव विश्वनाथ गजानन पाटेकर आहे. लहानपणी आईच्या मैत्रिणीने प्रेमाने त्यांना ‘नाना’ अशी हाक मारली आणि हेच नाव पुढे त्यांच्या आयुष्याची कायमची ओळख बनलं.
नाना पाटेकरांना ‘नाना’ का म्हणतात?
How Did Nana Patekar Get the Name ‘Nana’?

बॉलिवूड आणि मराठी सिनेमाला नाना हे नाव माहिती नाही असा एकही माणूस सापडणार नाही. दरदार संवाद,रोखठोक स्वभाव आणि साधं जगणं यामुळे नाना पाटेकर हे कायमच वेगळे ठरले. मात्र,त्यांच्या अकस्मात निधनाने भारतीय सिनेसृष्टीसह चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

वयाच्या 75 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. नाना हे त्यांच्या गोव्यातील घरी बेशुद्ध अवस्थेत आढळून आले होते त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. मात्र,डॉक्टरांनी नानांना मृत घोषित केले. खरं तर, हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाल्याची माहिती सध्या समोर येत आहे.

हेही वाचा-दुःख बाजूला ठेवलं, रंगमंच गाठला; नाना पाटेकर यांच्या आयुष्यातील ‘तो’ काळीज पिळवटणारा प्रसंग

नाना पाटेकरांचं नाव बदललं कसं?
नाना पाटेकर यांचे खरे नाव हे विश्वनाथ पाटेकर असे आहे, हे नाव फार कमी लोकांनाच माहिती आहे. 1 जानेवारी 1951 रोजी रागडच्या मुरुड-जंजिरा येथे एका मराठी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. वडील दिनकर पाटेकर आणि आई निर्मला पाटेकर. नाना पाटेकर यांचं शिक्षण मुंबईत झालं. मग विश्वनाथचे नाना कसे झाले, याचा एक किस्सा स्वत:नानांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले होता.

ते म्हणाले होते,”माझ्या आईची एक मैत्रीण होती, अगदी ती बहिणीसारखी. तीच लहानपणी मला लाडाने नाना-नाना म्हणायची. तेव्हापासूनच हे नाव चिकटलं. सुरुवातीला फक्त हे नाव घरातच घेतलं जायच, पण हळूहळू गल्ली, शाळा आणि मग अख्खं जग त्यांना नाना म्हणू लागलं.

हेही वाचा-‘सलाम बॉम्बे’ ते ‘परिंदा’… प्रत्येक भूमिकेत जीव ओतला! दमदार अभिनयाची छाप सोडणाऱ्या नानांचा कारकिर्दीचा प्रवास कसा होता?

पासपोर्टवरही नाना; नावाची खास कहाणी
नानांना शाळेत विशू किंवा विश्ननाथ सर्वजण म्हणायेच. नानांनी एकदा स्वत: सांगितलं होतं, आजही कोणी मला विशू म्हटलं तर समजतं, शाळेतला जुना मित्र आहे. गंमत म्हणजे हे लाडाचं नाव इतकं अधिकृत झालं आहे की, त्यांच्या पासपोर्ट, आधार कार्ड, सगळ्या कागदपत्रांवर नाना पाटेकर हेच नाव आहे.त्यांना हे नाव खूप आवडायचं.पडद्यावरचा कडक नाना आणि या नावामागे आईच्या मैत्रिणीचं निरागस प्रेम हाच तो धागा आहे जो नानांना आजही मातीशी जोडून ठेवतो.

Jai Maharashtra Marathi News Live Update

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version