दुःख बाजूला ठेवलं, रंगमंच गाठला; नाना पाटेकर यांच्या आयुष्यातील ‘तो’ काळीज पिळवटणारा प्रसंग

नाना पाटेकरांचा प्रवास केवळ अभिनयाच्या यशाची कहाणी नाही, तर संघर्ष, जिद्द आणि स्वाभिमानाची गाथा आहे. अत्यंत कठीण परिस्थितीतून त्यांनी रंगभूमीवर पाऊल ठेवले. पुढे अनेक अडचणींवर मात करत त्यांनी चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.
उपासमारीच्या दिवसांपासून अभिनयाच्या शिखरापर्यंत
Nana Patekar Untold Story

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या अकस्मात निधनाने भारतीय सिनेसृष्टीसह चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. वयाच्या 75 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. नाना हे त्यांच्या गोव्यातील घरी बेशुद्ध अवस्थेत आढळून आले होते त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. मात्र,डॉक्टरांनी नानांना मृत घोषित केले. खरं तर, हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाल्याची माहिती सध्या समोर येत आहे.

संघर्ष आणि यशाचा थक्क करणारा प्रवास
विश्वनाथ पाटेकर अर्थातच नाना पाटेकर यांचा जन्म हा 1 जानेवारी 1951 रोजी रायगडमधील मुरुड-जंजिरा येथे झाला होता. सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या नानांचे बालपण हे अनेक चढ-उतारांनी भरलेले होते. वडिलांच्या व्यवसायाला मोठा आर्थिक फटका बसल्यावर कुटुंबाची परिस्थिती बदलून गेली होती. त्यानंतर नानांना किशोरवयात घराला हातभार लावण्यासाठी काम करावे लागले.

हेही वाचा-मोठी बातमी! सिनेसृष्टीतील नटसम्राट हरपला; नाना पाटेकर यांनी वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

एवढंच नाही तर शिक्षण सांभाळत नानांनी चित्रपटांची पोस्टर्स रंगवण्याचेही काम केले होते. त्या वेळी आर्थिक चणचण इतकी होती की बऱ्याचदा तर पोटभर जेवण मिळणेही कठीण व्हायचे. या परिस्थितीने त्यांना जराही खचवले नाही. नानांनी कलेची आवड जपत त्यांनी सर जे.जे. इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्ट्समध्ये शिक्षण घेतले आणि अखेर रंभभूमीकडे आपली वाटचाल सुरु केली.

नाटकात येणाऱ्या अनुभवाने त्यांच्या अभिनयाला वेगळी धार मिळाली. पुढे चित्रपटसृष्टीत प्रवेश करताच त्यांनी छोट्या भूमिकांपासून स्वत:चे स्थान निर्माण केले. परिंदामधील भूमिकेने त्यांनी मोठी ओळख मिळवून दिली. त्यानंतर क्रांतीवीर, अंगार तसेच प्रहार सारख्या चित्रपटातून त्यांची दमदार अभिनयशैली लाखो प्रेक्षकांसमोर आली.

अभिनयासोबत सामाजिक कार्यातही नानांचा ठसा
वैयक्तिक आयुष्यत येत जाणारे कठीण प्रसंग समोरे जात नानांनी शेवटपर्यंत कामाशी असलेली बांधिलकी कायम ठेवली. अभिनय आणि दिग्दर्शनासोबत सामाजिक कार्यातही त्यांचा सक्रिय सहभाग कायम होता. महत्त्वाचे म्हणजे शेतकरी आणि गरजू कुटुंबांसाठी त्यांनी नाम फाउंडेशनच्या माध्यमातून मदतीचा हात पुढे केला.त्यांचा प्रवास आजही अनेकांसाठी प्रेरणादायी मानला जातो.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version