Earth New Photos: यानामधून दिसली अवघी पृथ्वी अन् अंतराळवीर विलोभनीय दृश्य पाहून झाले निःशब्द; नासाने केले फोटो व्हायरल

नासाच्या आर्टेमिस II मोहिमेतून अंतराळवीरांनी पृथ्वीचे विलक्षण सुंदर फोटो शेअर केले आहेत.

Earth New Photos: यानामधून दिसली अवघी पृथ्वी अन् अंतराळवीर विलोभनीय दृश्य पाहून झाले निःशब्द; नासाने केले फोटो व्हायरल

वॉशिंग्टन: अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था NASA (National Aeronautics and Space Administration) सध्या महत्त्वाकांक्षी Artemis II मोहिमेद्वारे पुन्हा एकदा मानवाला चंद्राच्या दिशेने घेऊन जात आहे. या मोहिमेत सहभागी अंतराळवीरांनी अंतराळातून पृथ्वीचे काही विलक्षण सुंदर फोटो पाठवले असून, ते पाहून संपूर्ण जग थक्क झाले आहे. जवळपास 50 वर्षांनंतर मानव पुन्हा चंद्राच्या दिशेने निघाल्यामुळे या मोहिमेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

नासाने त्यांच्या अधिकृत सोशल मीडियावर हे फोटो शेअर करत एक भावनिक संदेशही दिला. 1977 पासून बरेच काही बदलले असले तरी, अंतराळातून पाहिल्यावर पृथ्वी आजही तितकीच तेजस्वी आणि सुंदर दिसते, असे त्यांनी नमूद केले. अंतराळवीरांनी जेव्हा मागे वळून पृथ्वीचा नजारा पाहिला, तेव्हा तो क्षण अत्यंत भावूक करणारा होता.

या मोहिमेचे कमांडर राईड वाइजमन यांनी घेतलेल्या पहिल्या छायाचित्रात कॅप्सूलच्या खिडकीतून पृथ्वीचा वक्र भाग दिसतो. दुसऱ्या छायाचित्रात संपूर्ण पृथ्वी स्पष्टपणे दिसत असून निळे महासागर, पांढऱ्या ढगांचे थर आणि उत्तरेकडील हिरवट प्रकाश यांचा अद्भुत संगम पाहायला मिळतो. हा नजारा अंतराळातून अतिशय भव्य आणि मनाला स्पर्श करणारा असल्याचे नासाने सांगितले.

हेही वाचा: Nitesh Rane: ‘मुंब्य्राचं नाव बदलून मुंब्रादेवी करणार’; जाहीर सभेत नितेश राणेंचा थेट इशारा

नासाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, या छायाचित्रांमध्ये चार अंतराळवीर वगळता संपूर्ण मानवजातीचा समावेश आहे, ही जाणीवच रोमांचक आहे. सध्या हे अंतराळयान पृथ्वीपासून सुमारे 1.8 लाख किलोमीटर अंतरावर पोहोचले असून ते वेगाने चंद्राच्या दिशेने प्रवास करत आहे. अजून सुमारे 2.4 लाख किलोमीटर अंतर पार केल्यानंतर ते चंद्राजवळ पोहोचणार आहे.

या मोहिमेत तीन अमेरिकन आणि एक कॅनेडियन अंतराळवीर सहभागी आहेत. ते त्यांच्या ओरियन कॅप्सूलमधून चंद्राभोवती फेरी मारून पुन्हा पृथ्वीवर परतणार आहेत. विशेष म्हणजे, ते चंद्रावर उतरणार नाहीत, तर ‘यू-टर्न’ घेत थेट पृथ्वीच्या दिशेने परत येतील.

कमांडर वाइजमन यांनी एका मुलाखतीत सांगितले की, जेव्हा त्यांच्या कॅप्सूलच्या खिडकीतून संपूर्ण पृथ्वी दिसली, तेव्हा तो क्षण इतका अद्भुत होता की काही क्षण सर्व अंतराळवीर निःशब्द झाले. त्यांच्या मते, हा त्यांच्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय आणि सुंदर क्षणांपैकी एक आहे. 

हेही वाचा: Sunetra Pawar : जयची प्रमुखपदी नियुक्ती, तटकरे-पटेल यांची दिल्लीत भेट, तर दौऱ्यानंतर पहिला फोन उद्धव ठाकरेंना; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या राजकीय हालचालींना वेग

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number