भाविकांसाठी महत्त्वाची बातमी! नाशकातील रामकुंड काही दिवस बंद राहणार; महापालिकेची घोषणा

Nashik News : नाशिकमध्ये हजारोंच्या संख्येने दरदिवशी भाविक येत असतात. याच असंख्य भाविकांसाठी सर्वात मोठी माहिती समोर येत आहे. नाशिकमधील प्रसिद्ध राम कुंड परिसर बंद राहणार आहे. नेमका निर्णय का घेण्यात आला आणि किती दिवसांसाठी बंद राहणार जाणून घ्या.
प्रसिद्ध रामकुंड बंद राहणार
Nashik ramkund closed

नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्याची सध्या तयारी जोरात सुरु झालेली आहे. गोदाघाट परिसरात कामे सुरु झाल्यामुळे रामकुंड परिसर येत्या काही दिवसांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. या दिवसात फक्त दशक्रिया विधी सुरु राहिल. इतर पूजा आणि धार्मिक विधी हे दुसऱ्या ठिकाणी करावे लागणार आहे, असे प्रशासनाने सांगितलेले आहे. त्यामुळे इथे येणाऱ्या भाविकांना थोडा त्रास सहन करावा लागणार आहे, असे प्रशासनाने सांगितले आहे. त्यामुळे भाविकांना काहीसा तात्र सहन करावा लागणार आहे.

सोमवारी पत्रकार परिषद घेत ही माहिती कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह आणि महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी दिली. रामकुंड परिसर टप्प्याटप्याने बंद करुन तिथे आवश्यक कामे पूर्ण केली जाणार आहे. गर्दीचे नियोजन आणि पर्यायी व्यवस्था करण्याचेही काम सुरु आहे. रामकुंड हे महत्त्वाचे धार्मिक ठिकाण आहे, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे. ध्वजारोहण सोहळ्यापूर्वी सर्व कामे पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे. आता प्रशासनाने नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version