गेल्या दोन दिवसांपासून इंधन बचतीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेला आवाहन करत आहेत. परदेश प्रवास टाळा, सोनं खरेदी करू नका, तसेच वर्क फ्रॉम होम करा, शाळा ऑनलाईन भरा अशा प्रकारची आवाहनं जनतेला केली आहेत. अशातच आता सोनं खरेदी न करण्यावरून आता काही जुन्या घटनादेखील समोर येत आहेत.
दरम्याने नरेंद्र मोदी यांनी कोणताही घरात लग्न समारंभ, शुभकार्य असलं तरीही सोनं खरेदी करू नका असं आवाहन जनतेला केलं आहे. यावरून आता देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनीदेखील 1967 साली सोनं खरेदी करू नये असं आवाहन केलं होतं. त्याबद्दलची बातमी प्रसिद्ध वृत्तपत्र ‘द हिंदू’च्या पहिल्या पानावर आली असल्याचेदेखीव समोर आले होते. मात्र आता त्यावर मोठी अपडेट समोर आली आहे.
सोशल मिडियावर सर्वत्र इंदिरा गांधी यांच्या काळात सोनं खरेदी करू नये असं आवाहन केलं होतं. समोर आलेलं पेपरचं कात्रण हे खोटं असल्याचं ‘द हिंदू’ने स्पष्ट केलं आहे. ‘द हिंदू’ स्पष्ट केलं की, ‘व्हायरल झालेले मुखपृष्ठ बनावट असून ते त्यांच्या ऐतिहासिक संग्रहातील नाही”.
? A digitally altered image purporting to be a front page of The Hindu from June 6, 1967, is currently circulating on social media. We wish to clarify that this is not an authentic page from our archives. The Hindu urges readers to exercise caution and verify before sharing. — The Hindu (@the_hindu) May 12, 2026
तसेच पुढे त्यांनी लिहिलं की, प्रकाशनाने स्पष्टपणे म्हटले आहे: “6 जून, 1967 रोजीच्या ‘द हिंदू’ वृत्तपत्राचे मुखपृष्ठ असल्याचा दावा करणारी, डिजिटल पद्धतीने बदल केलेली एक प्रतिमा सध्या सोशल मीडियावर फिरत आहे. आम्ही हे स्पष्ट करू इच्छितो की, हे आमच्या संग्रहातील अस्सल पान नाही. ‘द हिंदू’ वाचकांना सावधगिरी बाळगण्याचे आणि शेअर करण्यापूर्वी पडताळणी करण्याचे आवाहन करत आहे.”
एकूणच काय तर, इंदिरा गांधींनी 1967 मध्ये भारतीयांना सोने खरेदी थांबवण्याचे आवाहन केले होते, हा खोटा दावा पुढे रेटण्यासाठी एक बनावट वृत्तपत्रीय कात्रण शेअर केले जात आहे. त्यामुळे अशा प्रकारची पोस्ट शेअर करताना सोशल मिडिया वापरकर्त्यांनी काळजी घ्यावी आणि त्यामागील तथ्य तपासावे.
The first one is a digitally altered page being wrongly presented as the front page of The Hindu on June 6, 1967. The second is the actual page released that day. This is what social media is capable of; it can even alter the front page of India's national English daily. pic.twitter.com/GZ4CHtu90s — B. Kolappan (@kolappan) May 12, 2026