Diwali Shopping: दिवाळी म्हणजे खरेदीचा आणि उत्साहाचा सण. यंदाच्या सणासुदीत भारतीय ग्राहकांनी खरेदीसाठी क्रेडिट कार्डचा धडाधड वापर केला आहे. पैसाबाजार (Paisabazaar) या डिजिटल ग्राहक क्रेडिट प्लॅटफॉर्मने केलेल्या सर्वेक्षणानुसार, 42 टक्के पेक्षा जास्त क्रेडिट कार्डधारकांनी 50,000 पेक्षा जास्त खर्च केला आहे. त्यापैकी 22 टक्के लोकांनी 50,000 ते 1 लाख इतका खर्च केला, तर 20 टक्के वापरकर्त्यांनी 1 लाखांहून अधिक खरेदी केली.
कशावर केला सर्वाधिक खर्च?
सर्वेक्षणानुसार, घरगुती उपकरणांवर सर्वाधिक खर्च झाला, त्यानंतर मोबाइल, गॅझेट्स आणि अॅक्सेसरीज (25 टक्के), कपडे (23टक्के), फर्निचर आणि डेकोरेशन (22टक्के), तसेच सोने आणि दागिने (18टक्के) यांचा क्रम लागतो. यावरून स्पष्ट होते की ग्राहक आता महागड्या आणि टिकाऊ वस्तूंमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देत आहेत.
हेही वाचा - Lenskart IPO: गुंतवणूकदारांनो तयार राहा! 'या' दिवशी उघडणार लेन्सकार्टचा IPO
ऑफर्सचा प्रभाव
सर्वेक्षणात समोर आलं की, 91 टक्के ग्राहक खरेदीपूर्वी त्यांच्या कार्डवरील ऑफर्स तपासतात. फक्त 10 टक्क्यांपेक्षा कमी लोक कोणत्याही ऑफरशिवाय सामान्य रिवॉर्ड्सवर अवलंबून राहतात. पैसाबाजारचे CEO संतोष अग्रवाल यांनी सांगितले, 'ग्राहक आता स्मार्ट झाले आहेत. ते त्यांच्या मोठ्या खरेदीसाठी सणासुदीच्या ऑफर्स आणि रिवॉर्ड्सच्या आधारावर नियोजन करतात.'
हेही वाचा - Orkla India IPO: ओर्कला इंडियाचा 1,667 कोटींचा आयपीओ; ग्रे मार्केटमध्ये प्रीमियम वाढ, गुंतवाणूकदारांना लिस्टिंग गेनची आशा
ऑनलाइन खरेदीचं वर्चस्व कायम
ग्राहकांच्या खरेदीच्या पद्धतीतही बदल दिसून आला आहे. 48 टक्के लोक ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही माध्यमातून खरेदी करतात, मात्र सर्वोत्तम ऑफर्स मिळवण्यासाठी 83 टक्के लोकांनी Amazon आणि Flipkart सारख्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मना प्राधान्य दिलं. या सर्वेक्षणातून स्पष्ट होतं की भारतीय ग्राहक आता अधिक जागृत आणि तंत्रज्ञानाभिमुख झाले आहेत. सणासुदीच्या काळात क्रेडिट कार्ड हे फक्त पेमेंटचं साधन नसून, स्मार्ट फायनान्शियल स्ट्रॅटेजी बनलं आहे.