Nora Fatehi Song Controvercy: नोरा फतेहीवर ‘वर्क परमिट’चा गैरफायदा घेतल्याचा आरोप; 10 वकिलांची टीम सरसावली, अभिनेत्रीची भारतातून होणार हकालपट्टी?

नोरा फतेहीवर चित्रित ‘सरके चुनर तेरी सरके’ या गाण्यावरून देशभरात वाद निर्माण झाला असून केंद्र सरकारने त्यावर बंदी घातल्याची माहिती लोकसभेत देण्यात आली आहे.

Nora Fatehi Song Controvercy: नोरा फतेहीवर ‘वर्क परमिट’चा गैरफायदा घेतल्याचा आरोप; 10 वकिलांची टीम सरसावली, अभिनेत्रीची भारतातून होणार हकालपट्टी?

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेहीवर चित्रित करण्यात आलेल्या ‘सरके चुनर तेरी सरके’ या गाण्यावरून देशभरात मोठा वाद निर्माण झाला असून आता हा वाद अधिक तीव्र होताना दिसत आहे. या गाण्यावर आक्षेप घेत केंद्र सरकारने त्यावर बंदी घातल्याची माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत दिली आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य पूर्णपणे अमर्याद नसून ते समाज आणि संस्कृतीच्या चौकटीतच वापरले गेले पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.

लोकसभेत बोलताना वैष्णव म्हणाले की, “या गाण्यावर बंदी घालण्यात आली आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करताना संविधानातील वाजवी मर्यादांचे पालन करणे आवश्यक आहे. समाज आणि संस्कृतीच्या संदर्भातच या स्वातंत्र्याचा वापर झाला पाहिजे.” दरम्यान, या गाण्यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच वाद निर्माण झाला असून हा चित्रपट 30 एप्रिल 2026 रोजी प्रदर्शित होणार असल्याची माहिती आहे.

हे गाणे मूळतः चित्रपटाचे दिग्दर्शक प्रेम यांनी कन्नड भाषेत लिहिले होते. हिंदी आवृत्तीचे गीतकार रकीब आलम यांनी या वादापासून स्वतःला दूर ठेवत सांगितले की त्यांनी केवळ मूळ कन्नड गीतांचे भाषांतर केले आहे. “ही गाणी मी लिहिलेली नाहीत. दिग्दर्शक प्रेम यांनी ती कन्नडमध्ये लिहिली होती. अशा प्रकारचे गीत लिहिण्यास मला सांगण्यात आले तेव्हा मी नकार दिला होता, कारण ते सेन्सॉर होण्याची शक्यता होती,” असे त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा: Rafale Deal: 114 ‘राफेल’ लढाऊ विमानांमुळे वाढणार भारतीय हवाई दलाची ताकद; भारताच्या वर्चस्वाने पाकिस्तान धास्तावला

दरम्यान, या प्रकरणामुळे अभिनेत्री नोरा फतेहीच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ‘सरके चुनर तेरी सरके’ या गाण्यावरून निर्माण झालेल्या वादामुळे तिच्या विरोधात तक्रारीही दाखल झाल्याची माहिती समोर येत आहे. काही संघटनांनी या गाण्यामुळे सांस्कृतिक भावना दुखावल्याचा आरोप केला आहे.

याच पार्श्वभूमीवर नोरा फतेहीवर वर्क परमिटचा गैरफायदा घेतल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या प्रकरणात पुढील कायदेशीर कारवाईची शक्यता वर्तवली जात असून दहा वकिलांची एक विशेष टीम मंत्रालयात जाऊन अधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याचे समजते. त्यामुळे या वादाचे पुढील वळण काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नोरा फतेहीची भारतातून हकालपट्टी सुद्धा होऊ शकते. 

सध्या या प्रकरणामुळे मनोरंजन क्षेत्रात मोठी चर्चा सुरू झाली असून अभिव्यक्ती स्वातंत्र्य, सेन्सॉरशिप आणि सांस्कृतिक संवेदनशीलता या मुद्द्यांवर पुन्हा एकदा राष्ट्रीय पातळीवर वाद पेटण्याची चिन्हे दिसत आहेत. आगामी काळात सरकार, चित्रपट निर्माते आणि संबंधित कलाकार यांच्याकडून काय भूमिका घेतली जाते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा: Railways Ticket Refund Rules: रेल्वे प्रवाशांना मोठा झटका, तिकीट परतावा नियमांत मोठे बदल; जाणून घ्या किती पैसे कापले जाणार

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number