राजधानी हादरली! राष्ट्रपती भवनाजवळ आगीची घटना; अग्निशमन दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी दाखल

राजधानी दिल्लीतील अत्यंत महत्त्वाच्या आणि अति-सुरक्षित मानल्या जाणाऱ्या नॉर्थ ब्लॉक (North Block) इमारतीत अचानक आग लागल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
राजधानी हादरली! राष्ट्रपती भवनाजवळ आगीची घटना; अग्निशमन दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी दाखल
North Block Delhi fire

देशाची राजधानी दिल्लीतील अत्यंत महत्त्वाच्या आणि अति-सुरक्षित मानल्या जाणाऱ्या नॉर्थ ब्लॉक (North Block) इमारतीत अचानक आग लागल्याने मोठी खळबळ उडाली आहे. राष्ट्रपती भवनाजवळ असलेल्या या व्हीव्हीआयपी इमारतीच्या वरच्या भागातून आकाशात धुराचे गडद लोट उठताना दिसल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. दिल्ली अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, नॉर्थ ब्लॉकच्या छतावर सध्या नूतनीकरण आणि बांधकामाचे काम सुरू होते. तेथे वेल्डिंग करत असताना उडालेल्या ठिणगीमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. सुदैवाने, अग्निशमन दलाच्या सतर्कतेमुळे आग वेळेत आटोक्यात आणण्यात यश आले आहे.

अग्निशमन दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी दाखल

नॉर्थ ब्लॉकमधून धूर निघत असल्याचे दिसताच दिल्ली अग्निशमन दलाला (DFS) तातडीने पाचारण करण्यात आले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अग्निशमन दलाने तात्काळ ६ गाड्या घटनास्थळी रवाना केल्या. जवानांनी घटनास्थळी पोहोचून तातडीने बचावकार्य सुरू केले आणि आगीचा भडका पसरण्यापूर्वीच त्यावर पूर्णपणे नियंत्रण मिळवले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

हेही वाचा – आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांचे हाल; मुलुंड-ठाणे दरम्यान लोकल खोळंबली, नेमके कारण काय?

खासदार मिलिंद देवरा यांनी फोटो शेअर करत व्यक्त केली चिंता

राज्यसभेचे खासदार मिलिंद देवरा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर या घटनेची माहिती देत धुराचे छायाचित्र शेअर केले. त्यांनी लिहिले की, “संसदेकडे जात असताना मला नॉर्थ ब्लॉकच्या मागच्या बाजूने धुराचे मोठे लोट निघताना दिसले. तिथे आग लागल्याचे स्पष्ट होत असून सर्वजण सुरक्षित असतील अशी आशा आहे.” दरम्यान, यापूर्वी दिल्लीतील कडकरडूमा कोर्ट संकुलातील स्कॅनिंग रूममध्ये पहाटे 5:22 वाजता आग लागली होती. त्यावेळी 8 गाड्यांनी 5:50 वाजेपर्यंत आगीवर नियंत्रण मिळवले होते. मात्र, दिल्लीतील महत्त्वाच्या सरकारी इमारतींमध्ये वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version