Jammu and Kashmir : पूंछमध्ये पाकिस्तानी ड्रोनची घुसखोरी; भारतीय लष्कराचा चोख प्रत्युत्तर देत गोळीबार

पूंछ जिल्ह्यातील नियंत्रण रेषेजवळ एका संशयास्पद ड्रोनची हालचाल दिसली. हे ड्रोन भारतीय हद्दीत प्रवेश करत असल्याचे लक्षात येताच लष्कराच्या जवानांनी तात्काळ कारवाई करत त्यावर गोळीबार सुरू केला.

Jammu and Kashmir : पूंछमध्ये पाकिस्तानी ड्रोनची घुसखोरी; भारतीय लष्कराचा चोख प्रत्युत्तर देत गोळीबार

Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात पाकिस्तानने पुन्हा एकदा आपल्या कुरापती सुरू केल्या आहेत. नियंत्रण रेषा (LoC) ओलांडून एका पाकिस्तानी ड्रोनने भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सीमेवर तैनात असलेल्या सतर्क भारतीय जवानांनी या ड्रोनवर गोळीबार करत पाकिस्तानचा हा नापाक डाव उधळून लावला.

नेमकी घटना काय?
मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, रविवारी पहाटेच्या सुमारास पूंछ जिल्ह्यातील नियंत्रण रेषेजवळ एका संशयास्पद ड्रोनची हालचाल दिसली. हे ड्रोन भारतीय हद्दीत प्रवेश करत असल्याचे लक्षात येताच लष्कराच्या जवानांनी तात्काळ कारवाई करत त्यावर गोळीबार सुरू केला. भारतीय सैन्याच्या आक्रमक पवित्रा पाहून ड्रोन पुन्हा पाकिस्तानच्या दिशेने मागे फिरले. या घटनेनंतर परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली असून शोध मोहीम राबवली जात आहे.

फेब्रुवारीमध्येही दिसले होते संशयास्पद ड्रोन
पूंछमध्ये ड्रोन दिसण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी 27 फेब्रुवारी रोजी देखील याच भागात संशयास्पद ड्रोन हालचाली आढळल्या होत्या. त्यावेळी देखील भारतीय लष्कराने गोळीबार करून ड्रोनला पळवून लावले होते. तेव्हापासून संपूर्ण सीमा भागात सैन्य हाय अलर्टवर असून शत्रूच्या प्रत्येक हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

दहशतवाद्यांचा अड्डा उद्ध्वस्त; मोठा शस्त्रसाठा जप्त
ड्रोनच्या घुसखोरीसोबतच भारतीय लष्कराला सीमेवर मोठे यश मिळाले आहे. बुधवारी पूंछ जिल्ह्यातील 'गनी' वनक्षेत्रात लष्कराच्या 'व्हाइट नाईट कॉर्प्स' आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. या मोहिमेत दहशतवाद्यांचा एक अड्डा उद्ध्वस्त करण्यात आला. घटनास्थळावरून 5 किलोपेक्षा जास्त वजनाचे दोन आयईडी (IED), चिनी हँडग्रेनेड, एक 9 मिमी पिस्तूल आणि मोठ्या प्रमाणात जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

हेही वाचा – India On Iran Israel War : इस्रायल-इराण युद्धावर भारताने व्यक्त केली चिंता, नागरिकांसाठी अ‍ॅडव्हायजरी जारी

भारताचे 'झिरो टॉलरन्स' धोरण
पाकिस्तानकडून सातत्याने ड्रोनद्वारे शस्त्रे किंवा अमली पदार्थांची तस्करी करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. मात्र, भारताने दहशतवादाविरुद्ध 'झिरो टॉलरन्स' (शून्य-सहिष्णुता) धोरण स्वीकारले आहे. पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या घुसखोरीचे प्रयत्न भारतीय सैनिक अत्यंत प्रभावीपणे मोडून काढत आहेत. भारताच्या या कठोर कारवाईमुळे सीमापार बसलेल्या दहशतवादी संघटनांमध्ये आणि त्यांच्या म्होरक्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number