Saturday, February 08, 2025 04:17:50 PM

PANKAJA MUNDE PRESS CONFERENCE
'बीड जिल्ह्याचे राजकीय वातावरण बदलणार' पंकजा मुंडे यांचा मोठा गौप्यस्फोट

मंत्रालय स्तरावर विविध मुद्द्यांवर चर्चा सुरू आहे आणि मुख्यमंत्री, गृहमंत्री यांनी कडक कारवाईची हमी दिली आहे. बीड जिल्ह्यात पर्यावरण सुधारण्यासाठी विश्वास व्यक्त केला जात आहे.

बीड जिल्ह्याचे राजकीय वातावरण बदलणार पंकजा मुंडे यांचा मोठा गौप्यस्फोट

मुंबई : मुख्यमंत्री यांनी डस्ट पार्टिकल्सच्या समस्येवर १०० दिवसांचा प्लान तयार करण्याची घोषणा केली आहे. या संदर्भात टास्क फोर्स तयार करण्यात येत आहे, ज्यात परिवहन, मेडिकल विभाग समाविष्ट असतील. प्रदूषण कमी करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. पर्यावरण सुधारण्यासाठी केंद्रासोबत समन्वय ठेवला जात आहे. प्लास्टिक बंदीसाठी कडक पावले उचलली जात आहेत, नागरिकांना ऑनलाइन ॲपद्वारे प्लास्टिक वापरावर नियंत्रण ठेवण्याचे आवाहन केले जात आहे. मंत्रालय स्तरावर विविध मुद्द्यांवर चर्चा सुरू आहे आणि मुख्यमंत्री, गृहमंत्री यांनी कडक कारवाईची हमी दिली आहे. बीड जिल्ह्यात पर्यावरण सुधारण्यासाठी विश्वास व्यक्त केला जात आहे.

पर्यावरण हे भविष्य आहे, स्वच्छ असावं, राज्याचे मुख्यमंत्री यांनी १०० दिवसांचा प्लान सांगितला आहे. तो तयार करतोय, आम्ही टास्क फोर्स तयार करतोय, ज्यात परिवहन, मेडिकल असे विभाग पण असतील. आपण आता १००-२०० मध्ये आहोत, ते कसं कमी करता येईल हे बघतोय. खुदकाम बांधकाम करतोय आणि त्याचा परिणाम दिसतोय.

सर्वांत महत्वाची बातमी वाचा : 'ईव्हीएम हॅक होवू शकत नाही' : मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांचा दावा, इलॉन मस्कला दिलं उत्तर

हवामान थंड आहे आणि हवा वाहात नसल्याने स्मोग आहे. कमीत कमी प्रदूषण असावं याच्या उपाययोजना करतोय. वेगवेगळ्या विभागांना संपर्क करतोय, फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत कमी करण्याचा प्रयत्न करू. आम्ही केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांची भेट घेतली. केंद्रासोबत समन्वय ठेवू. प्रदूषण हा झोनमधला विषय आहे. कितीही कडक नाॅर्म करता आलेत तर करु. प्रदूषण कंन्ट्रोल बोर्डला नोटीस देण्याचे अधिकार आहेत.

प्लास्टिक बंदीवर भूमिका 
जे प्लास्टिक हानिकारक आहे त्यासंदर्भात कडक भूमिका आपण आधीच घेतली आहे. आम्ही ऑनलाइन ॲप करतोय, नागरिकांना सांगतोय फोटो काढा आणि यासंदर्भात जिओ टॅग करा, आम्ही कारवाई करू. 

बीड प्रकरणावर पंकजा मुंडे काय म्हणाल्या ?
मी छोट्या लेव्हलच्या विषयांना हाताळते. मी पहिलं पत्र लिहिलं आणि जिथे व्यक्त व्हायचं तेंव्हा व्यक्त झाले. नागपुरात माध्यमांना देखील माझं मत सांगितलं. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी सांगितलं तपास होईल आणि हयगय करणार नाही. कडक शिक्षा करु सांगितले आहे, मी मंत्री आहे, अशात आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे.

नाव न घेता धसांना टोला ; मोर्चा काढत असू तर आपणच आपल्या सरकारवर अविश्वास दाखवतोय
माझ्या मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय तर आम्हीच प्रश्न उभे करत असू तर ते त्यांच्यावरच संशय घेण्यासरखं होईल. रोज मीडियासमोर बोलावं त्यात काय आहे. निघृण आपला व्यवहार असतो, राजकारण करण्याचा प्रयत्न होतोय. मी जे बोलले ते रेकाॅर्डवर आहे. मला माहिती नाही कोण आहे त्यात मग मी कसा आरोप करु कोणावर.

आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे, हे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. माझा कार्यकर्ता होता तो. ह्याच्या तून काही वेगळं मिळवण्याचा प्रयत्न कोणीही करु नये. हे अधिकारी मी आणले का? पालकमंत्री, मुख्यमंत्री यांनी आणले होते. मात्र पालकमंत्री होते ते पण बोलत आहेत शिक्षा झाली पाहिजे, न्याय मिळाला पाहिजे. त्यांच्या मुलांना घेऊन भाषण करणं मला योग्य वाटत नाही.

 धनंजय मुंडेवर भाष्य 
त्यांच्या पक्षाचे नेते आणि सर्वोच्च नेते उत्तरं देऊ शकतात. माझे काही प्रोटोकॉल आहेत, मी मंत्री आहे.

अंजली दमानियाबद्दल काय म्हणाल्या ?
आपल्याला जेही धमक्या देत आहेत त्यांची तक्रार करा. मी देखील महिला आयोगाला विनंती करेल. माझा संबंध नाही आहे. त्यांना कोणी असं बोलत असेल तर चुकीचं आहे. मला त्यांचा आदर आहे, मात्र त्यांनी माहिती आली त्याआधारे न बोलता कसं बोलायचं. मी प्रत्येकाला परिचित नाही आहे. त्यांनी कारवाई करावी त्यांचा अधिकार आहे.

जिल्ह्याचे वातावरण बदलणार ?
उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्यमंत्री फडणवीस जिल्ह्याचे पर्यावरण सुधारू शकतील. मला त्यांच्यावर विश्वास आहे. मन जड होतं हे बोलतानाही की जिल्ह्याचे वातावरण बिघडलं आहे. राजकीय पर्यावरण लवकरच बदलेल असा मला विश्वास आहे.

क्लिक करा. -  जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी  व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.


सम्बन्धित सामग्री