मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी आनंददायी ठरणार आहे. जीवनसाथीचा प्रेमळ आणि चांगला मूड तुमचा संपूर्ण दिवस उजळवून टाकेल. दिवसाची सुरुवात सकारात्मक होईल, मात्र काही कारणामुळे सायंकाळी आर्थिक खर्च होण्याची शक्यता आहे, त्यामुळे थोडी काळजी घ्या. बोलताना शब्दांवर नियंत्रण ठेवा. नातेसांबंध सुधारण्यासाठी जवळच्या व्यक्तींशी प्रामाणिक संवाद साधा.
वृषभ: आजचा दिवस तुमच्यासाठी आत्मविश्वास वाढवणारा आणि सकारात्मक विचारांना चालना देणारा ठरू शकतो. स्वत:ला अधिक आशावादी बनवन्याचा प्रयत्न करा. आज अनावश्क खर्च होण्याची शक्यता आहे. मात्र, तरीही गरजेपेक्षा जास्त खर्च करणे टाळा.
मिथुन: आज दिवस तुमच्यासाठी प्रगतीचा आणि आत्मविश्वास वाढवणारा ठरेल. आर्थिकदृष्ट्या स्थैर्य मिळेल. यासह, अतिरिक्त पैसा स्थावर-मालमत्तेत गुंतवण्यासाठी योग्य वेळ आहे. जे लोक परदेशातील व्यापाराने जोडलेले आहे आज त्यांना मनासारखे फळ मिळण्याची शक्यता आहे.
कर्क: आज तुमच्याकडे प्रचंड प्रमाणात ऊर्जा असेल, मात्र कामाच्या ताणामुळे तुम्ही त्रासून जाल. परदेशात संबंध असलेल्या व्यावसायिकांना आज आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे, म्हणून आज विचारपूर्वक निर्णय घ्या. घरगुती कामं कंटाळवाणी होतील आणि मानसिक तणावाला निमंत्रण देणारी असतील. आज काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ऑफिसमधील इतर गोष्टींपासून लांब राहण्याची आवश्यकता आहे.
सिंह: ऑफिसमधून लवकर बाहेर पडण्याचा प्रयत्न करा आणि स्वत:साठी वेळ द्या आणि स्वत:वर खर्च करा. पुरातन वस्तू आणि दागिन्यांमध्ये गुंतवणूक केल्यामुळे तुम्हाला फायदा होईल. आपल्या आजी आजोबांशी बोलताना त्यांच्या भावना दुखावल्या जाणार नाही, याची काळजी घ्या आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवा. आजचा दिवस खूप संदर आहे. नेहमीपेक्षा आज तुमचे सहकारी तुम्हाला चांगल्या प्रकारे समजून घेतील.
कन्या: कुटुंबातील काही सदस्यांच्या जळूवृत्ती वागणुकीमुळे आज तुम्ही त्रासून जाल. मात्र, रागावर नियंत्रण ठेवा अन्यथा परिस्थिती बिघडू शकते. आज तुम्हाला पैश्याची अत्यंत आवश्यकता असेल, परंतु तुमच्याकडे पर्याप्त धन नसेल. प्रेमसंबंधांसाठी आजचा दिवस अनुकूल आहे.
तूळ: आरोग्य राखण्यासाठी आणि छान दिसण्यासाठी आज तुमच्याकडे खूप वेळ आहे. आज तुम्हाला लोन मिळण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जबाबदारी डोक्यावर असल्यामुळे आज तुमच्या मनावर दडपण येईल. आपल्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या व्यक्तीवर किंवा त्याच्या निष्ठेवर शंका घेऊ नका.
वृश्चिक: आज तुम्ही जीवनसाथीच्या आरोग्याकडे लक्ष देणे आणि त्यांची देखभाल करणे गरजेचे आहे. प्रलंबित देणी आल्यामुळे आज तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आज तुम्ही तुमच्या भावाला मदत करा. येणाऱ्या समस्यांना सामंजस्याने सोडवण्याचा प्रयत्न करा.
धनु : तुम्ही तुमच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याला संतुलित ठेवण्याचा प्रयत्न करा. घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तू खराब झाल्याने आज तुमचे पैसे खर्च होण्याची शक्यता आहे. आज तुम्हाला तुमच्या कामाच्या शैलीकडे लक्ष देण्याची गरज आहे, अन्यथा तुमच्या बॉसच्या नजरेत तुमची प्रतिमा नकारात्मक होऊ शकते.
मकर: इतरांसोबत व्यक्त होण्याच्या चिंतेने तुम्ही उदास राहाल. मात्र, तुमच्या आत्मसन्मानाला प्रोत्साहन द्या आणि ही चिंता दूर करा. लवकरच तुमच्या आर्थिक स्थितीतील बदल होणार.
कुंभ: सकारात्मकपणे विचार करण्याची सवय लावा. जे लोक दुधाच्या व्यवसायाशी जोडलेले आहे, आज त्यांना आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. नवीन प्रकल्प आणि खर्च लांबणीवर टाकण्याची गरज आहे. कामाचे ताण असल्यामुळे, आज तुम्ही तुमच्या मित्रांना आणि कुटुंबीयांना वेळ देऊ शकणार नाही.
मीन: प्रत्येक माणसांचे सांगणे ऐका, असे केल्याने तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळतील. घरातील लहान-लहान गोष्टींवर आज तुमचे पैसे मोठ्या प्रमाणात खर्च होणार आहे, ज्यामुळे तुम्ही मानसिक तणावात येऊ शकता. आज तुम्हाला तुमचे काम वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
(Disclaimer : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)